मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /36 तासात 5 हत्या; यमुना एक्सप्रेस-वेच्या कडेला आणखी 2 महिलांचे मृतदेह

36 तासात 5 हत्या; यमुना एक्सप्रेस-वेच्या कडेला आणखी 2 महिलांचे मृतदेह

धक्कादायक म्हणजे अद्याप या हत्येमागील कारणं समोर आलेली नाहीत.

धक्कादायक म्हणजे अद्याप या हत्येमागील कारणं समोर आलेली नाहीत.

धक्कादायक म्हणजे अद्याप या हत्येमागील कारणं समोर आलेली नाहीत.

मथुरा, 4 नोव्हेंबर : यमुना एक्सप्रेस-वेच्या (Yamuna Express-way) किनाऱ्यावर आणखी दोन मृतदेह (Dead body) सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. यमुना एक्सप्रेस-वेच्या किनाऱ्यावर हत्या करून कोण मृतदेह फेकत आहे याचा शोध घेतला जात आहे. जनपदमध्ये गेल्या 36 तासात 5 हत्याची प्रकरणं समोर आली आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनाही याबाबत अद्याप कोणती माहिती मिळू शकलेली नाही. मात्र तपास सुरू आहे. विषेश म्हणजे हत्या कुठे केली जात आहे याबाबतही कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.

मंगळवारी सापडला होता 15 वर्षीय मुलाचा मृतदेह

मंगळवारी यमुना एक्सप्रेस-वेच्या माइलस्टोन संख्या 78 वर एका 15 वर्षीय मुलाचा मृतदेह काटेरी ताऱ्यांना लटकलेला दिसला. यानंतर दुसरा मृतदेह 10 वर्षीय मुलाचा सापडल्याने खळबळ उडाली. यानंतर जवळपासच 35 वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह झाडीझुडप्यात सापडला.

हे ही वाचा-'मुझे पहचानता नही क्या' विचारणाऱ्या कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून हत्या

गुरुवारी हायवे पोलीस ठाणे भागातील बाकलपूरजवळ 28 वर्षीय पूजा नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला. पूजेचा पती नरेंद्र बीएसएफमध्ये आहेत आणि श्रीनगरमध्ये पोस्टेड आहे. महिलेला गोळी लावली होती. ती सकाळी घरातून फोनवर बोलत बोलत निघाली होती. त्यानंतर तिची मृतदेह येथे सापडला. मात्र या मृत्यूमागील कारणं अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे.

First published:

Tags: Crime news, Murder, Woman dead body