मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

बॉम्ब फुटणार का? भुजबळांनी दिला देवेंद्र फडणवीसांना आराम करण्याचा सल्ला

बॉम्ब फुटणार का? भुजबळांनी दिला देवेंद्र फडणवीसांना आराम करण्याचा सल्ला

'आता दिवाळीनंतर काही जणांनी बॉम्ब फोडण्याची धमकी दिली आहे. पण ज्यांच्याकडे पैसे आहेत ते खरोखर बॉम्ब फोडत आहेत.

'आता दिवाळीनंतर काही जणांनी बॉम्ब फोडण्याची धमकी दिली आहे. पण ज्यांच्याकडे पैसे आहेत ते खरोखर बॉम्ब फोडत आहेत.

'आता दिवाळीनंतर काही जणांनी बॉम्ब फोडण्याची धमकी दिली आहे. पण ज्यांच्याकडे पैसे आहेत ते खरोखर बॉम्ब फोडत आहेत.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 04 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी धुरळा उडवल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी थेट भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनीही दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला आहे. पण, राजकीय बॉम्ब फोडायला दिवाळी लागत नाही. मला वाटतं आता सर्वांनी आराम करावा' असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal)यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुंबईत लक्ष्मीपूजन करून दिवाळी साजरी केली. यावेळी न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता, त्यावरही भाष्य केलं.

Diwali Celebrations 2021: पाहा, जगभरातील दिवाळी सेलिब्रेशनचे PHOTOs

'आता दिवाळीनंतर काही जणांनी बॉम्ब फोडण्याची धमकी दिली आहे. पण ज्यांच्याकडे पैसे आहेत ते खरोखर बॉम्ब फोडत आहेत. राजकीय फटाके फोडायला दिवाळी लागत नाही. मला वाटतं आता सर्वांनी आराम करावा, असा सल्लाही भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांना दिला.

'नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक पुरावे दिले आहे. त्यामुळे एनसीबीची पोलखोल झाली आहे. एक माणूस दोन धर्म आणि वडिलांची दोन दोन नावे हा सगळा संभ्रम अजूनही दूर झालेला नाही, असं म्हणत भुजबळ यांनी नव्या वादाचे संकेत दिले आहे.

तसंच, अनिल देशमख यांच्यावर झालेले कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने आणि दुर्दैवी आहे. देशमुख यांच्याविरोधात ज्यांनी तक्रार दिली ते फरार आहे. अनिल देशमुख यांना असा त्रास का दिला जात आहे हे कळत नाही, असंही भुजबळ म्हणाले.

Photo : दिवाळी स्पेशल या अभिनेत्रींचा मराठमोळा लुक एकदा पाहाच!

'ज्या पद्धतीने हे सर्व सुरू आहे त्याचा फायदा भाजपला किती होईल हे भाजपने पाहिले पाहिजे. आता ज्या पोट निवडणुका झाल्या त्याचा भाजपला काय फायदा होणार नाही, हे भाजपने लक्ष्यात ठेवावे, असा टोलाही भुजबळांनी भाजपला लगावला.

First published: