मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अशोक चव्हाणांना पुन्हा मुख्यमंत्री करणार, काँग्रेस नेत्याचे मोठे विधान

अशोक चव्हाणांना पुन्हा मुख्यमंत्री करणार, काँग्रेस नेत्याचे मोठे विधानसार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

'काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या विजयामुळे अशोक चव्हाण यांचे कुशल नेतृत्व दिसून आले आहे'

  • Published by:  sachin Salve

नांदेड, 02 नोव्हेंबर : नांदेड देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (Deglur assembly election bopolls result) काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. तर दुसरीकडे, अशोक चव्हाण (ashok chvan) यांना पुन्हा मुख्यमंत्री (cm) करण्यासाठी प्रयत्न करा, असा निर्धारच अशोक चव्हाण यांचे मेव्हणे भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) यांनी केला आहे. पण, त्यांचा या मागणीवर अशोक चव्हाण यांनी हात जोडून नकार दिला आहे.

देगलूर पोटनिवणुकीत काँग्रेसने बाजी मारल्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. अशोक चव्हाण यांचे मेव्हणे भास्करराव पाटील खतगावकर यांनी पत्रकारांशी बोलत असताना मनातली इच्छाच बोलून दाखवली.

'फडणवीसांनी दिवाळीत फराळ खावा आणि संगीत ऐकावं', नीलम गोऱ्हेंचा टोमणा

अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून दिला आहे. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या विजयामुळे अशोक चव्हाण यांचे कुशल नेतृत्व दिसून आले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच या निवडणुकीत यश मिळाले आहे. उद्या पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदी पाहायचे आहे. जनतेनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे, आता त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न करणार असा निर्धारच खतगावकर यांनी बोलून दाखवला.

भाजपला एक चूक पडली भारी, अशोक चव्हाणांनी फटाक्यांची माळ लावली दारी!

तरदुसरीकडे अशोक चव्हाण यांनी या निकालावर प्रतिक्रिया देत भाजपवर सडकून टीका केली. भाजपने प्रचारात अत्यंत खालची पातळी गाठून प्रचार केला होता. पण देगलूरच्या जनतेनं त्यांना साथ दिली नाही. आम्ही विकासाच्या मुद्दा घेऊन निवडणूक लढवली. काँग्रेसला पूर्वीपेक्षा जास्त मतदान मिळालं आहे. राज्यस्थानमध्ये सुद्धा काँग्रेसने दोन जागा जिंकल्या आहे. नांदेडमधला हा विजय संपूर्णपणे महाविकास आघाडीचा आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

काँग्रेसचा दणदणीत विजय

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या देगलूर विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. शेवटच्या फेरीअखेरीस जितेश अंतापूरकर यांना 108840 मते मिळाली तर भाजपच्या सुभाष साबणे (Subhash Sabane) 66907 मते मिळाली. यामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी 41933 मतांनी जिंकली आहे. जितेश अंतापूरकर यांच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.

First published: