मुंबई, 02 नोव्हेंबर : भाजपचे (bjp) नेते किरीट सोमय्या (kirit somiya) आपल्या पोतडीतून महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) आमदारांपासून ते मंत्र्यांवर नेहमी वेगवेगळे आरोप करत असतात. आजही त्यांनी राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एवढंच नाहीतर 1000 कोटींची संपत्ती जप्त केल्याचा दावाही केली. पण, त्यांच्या हा फटाका पार फुसका निघाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधीत काही संपत्तीवर आयकर विभागाने एकूण 1000 कोटी रुपयांची ही संपत्ती जप्त करण्याच्या संदर्भात नोटीस बजावली असं वृत्त समोर आले होते. परंतु, कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही आली नाही. प्रसार माध्यमांमध्ये पेरलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाने प्रेरित आहे, असा खुलासा अजित पवारांकडून करण्यात आला. काय? अनुष्का शर्माने केलं अर्धशतक! BCCI च्या ट्वीटची तुफान चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील म्हणाले की, ‘अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. काय? राज कुंद्रानं जेलच्या बाहेर येताच सर्वात आधी केलं ‘हे’ धक्कादायक काम प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असं आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे. काय म्हणाले होते किरीट सोमय्या? अजित पवार यांच्याशी संबंधीत एकूण 1000 कोटी रुपयांची ही संपत्ती आयकर विभागाकडून जप्त करण्याच्या संदर्भात नोटीस बजावण्यात आली. आयकर विभागाने ज्या संपत्ती जप्त करण्याच्या संदर्भात नोटीस बजावली आहे त्यामध्ये एक साखर कारखाना, दक्षिण दिल्लीतील एक फ्लॅट, गोव्यातील मालमत्ता, मुंबईतील निर्मल इमारतीचा समावेश असल्याचा दावा सोमय्यांनी केला होता.
Income Tax attached Properties of Ajit Pawar
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 2, 2021
1. Jarandeshwar sugar factory
₹600 crore
2. South Delhi flat ₹20 crores
3. Nirmal office of Parth pawar
₹25 crores
4. Goa Resort "Nilaya" of ₹250 crores @BJP4India pic.twitter.com/jObd05BNde
तसंच, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीच ट्वीट करून’प्राप्तिकर विभागाने (Income Tax Dept) अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचे नरिमन पॉइंट निर्मल बिल्डिंग कार्यालय आणि अजित पवार यांच्या आई, पत्नी, बहिणी, जावई… यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत असे समजते.’ अशी माहिती दिली होती.