मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

aryan khan bail : जामीन मिळूनही आर्यनचा आजचा मुक्काम जेलमध्येच, 'हे' कारण आलं समोर!

aryan khan bail : जामीन मिळूनही आर्यनचा आजचा मुक्काम जेलमध्येच, 'हे' कारण आलं समोर!

आर्यनला अटी शर्तीसह 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आर्यनला अटी शर्तीसह 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आर्यनला अटी शर्तीसह 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई, 29 ऑक्टोबर : क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानला (Aryan Khan bail) जामीन मिळाला आहे. आज त्याची आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Jail mumbai) सुटका होणार होती. पण, नेमकं कोर्टात बेल देण्याबद्दलची प्रक्रिया अपूर्ण राहिली त्यामुळे आर्यनला जेलबाहेर येता आले नाही. त्यामुळे आर्यनसह तिघांना आजची रात्र जेलमध्ये घालवावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला जामीन मंजूर झाला आहे. आर्यनला अटी शर्तीसह 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.  गेल्या 25 दिवसांपासून आर्थर रोड कारागृहात असलेल्या आर्यन खानसह तिघांची जामिनावर सुटका होणार म्हणून शाहरुख खानचे चाहत्य जेलबाहेर आतुरतेनं वाट पाहत होते. शेअर बाजारातील पडझडीदरम्यान 'हे' दोन स्टॉक खरेदीचा ब्रोकरेजचा सल्ला आर्यनचे वकील सतिश माने शिंदे, मुनमुनचे वकील काशिफ खान आणि  टीम सेशन्स कोर्टात पोहोचली. अभिनेत्री जुही चावला आर्यनच्या सुअरिटी करता आली.आर्यन करता जुही चावला जामीनदार म्हणून सही केली. पण, जामिनासाठी लागणारी कागदपत्र हे वेळेवर आर्थर रोड जेलमध्ये पोहचली नाही. जामीन अर्ज पेटीमध्ये दस्तावेज 5.30 वाजेपर्यंत पोहोचणे गरजेचं होतं. पण, 5.30 वाजता पेटी उघडली असता आर्यनच्या जामिनाबाबत कोणतेही कागदपत्र आढळून आली नाही. त्यामुळे आर्यनला आजची रात्र जेलमध्येच घालवावी लागणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता आर्यनची जेलमधून सुटका होणार आहे. कारण, पहाटे 5.30 वाजता जेलमधील जामीन बॉक्स उघडला जाणार आहे. त्यामध्ये  मुंबई सत्र न्यायालयाने आर्यनला दिलेली रिलीज ऑर्डर टाकली जाणार आहे. ही रिलीज ऑर्डर जेलच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे.  मात्र तरीही सकाळी 11 वाजेशिवाय आर्यन बाहेर येणार नाही.  कारण रिलीज ॲार्डर जेल प्रशासनास मिळाल्यानंतर सकाळी कोर्ट उघडल्यावर जेल प्रशासन कोर्ट प्रशासनाकडून रिलीज ॲार्डर कन्फर्म करुन घेणार आहे. या प्रक्रियेला सकाळचे 10 वाजणार आहे. तिथून पुढे आर्यनला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होईल. आर्यनला देश सोडून जाता येणार नाही! दरम्यान, मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरू होता. अखेरीस आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी जमेची बाजू लावून धरत आर्यन खानला जामीन मिळवून दिला.आता आर्यनसही तिघांची जामिनीवर सुटका होणार आहे. जामीन अर्जामध्ये अनेक अटींची आर्यनला पालन करावे लागणार आहे. माकडाने पळवला चष्मा, परत मिळवण्यासाठी द्यावी लागली लाच; पाहा VIDEO एकूण 5 पानांची ॲार्डर आहे. 1 लाख रुपयांचा जातमुचलक्यावर प्रत्येकी जामीन मंजूर करण्यात आला आहे. असा गुन्हा परत करू नये, इतर आरोपींशी बोलू नये, साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, देश सोडू नये,  मीडियाची, सोशल मीडियावर बोलू नये असे नियम घालण्यात आले आहे. त्याचबरोबर ncb ऑफिसमध्ये प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2 वेळात हजर राहावे लागणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या