मुंबई, 29 ऑक्टोबर : माकडाने एका माणसाचा चष्मा (Video of monkey taking specks of a man goes viral) पळवून त्याच्या बदल्यात खाण्याची वस्तू कशी मिळवली, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सध्या दररोज वेगवेगळ्या प्रकारचे (Viral videos of social media) व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही गंभीर असतात तर काही मजेशीर असतात. एका माकडाचा सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ हा भलताच मजेशीर आहे.
Smart 🐒🐒🐒
— Rupin Sharma IPS (@rupin1992) October 28, 2021
Ek haath do,
Ek haath lo 😂😂😂😂🤣 pic.twitter.com/JHNnYUkDEw
माकडाने पळवला चष्मा या व्हिडिओ एक माकड माणसाचा चष्मा पळवून एका पिंजऱ्यावर जाऊन बसल्याचं दिसत आहे. माकडानं आपल्या हातात माणसाचा चष्मा पकडला आहे. ज्याचा हा चष्मा आहे, ती व्यक्ती चष्मा मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. मात्र माकडाच्या चपळाईपुढं त्याची चपळाई अगदी तोकडी पडत आहे. माकडाला दिली फ्रुटी माणसाने अखेर आपला चष्मा मिळवण्यासाठी माकडाला लाच देण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय किती योग्य होता, ते माकडानेही सिद्ध केले. माणसाने माकडाला एक फ्रुटी दिली. ती दिल्याव माकडाने अगदी साळसूदपणे माणसाला चष्मा दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावर मजेशीर प्रतिक्रियादेखील आल्या आहेत. हे वाचा- aryan khan bail : अखेर आर्यन खानची आर्थर रोड जेलमधून सुटका माकडात माणसाचे गुण माकडात हळूहळू माणसाचे गुण येऊ लागल्याचं हे लक्षण असल्याची प्रतिक्रिया एकाने दिली आहे. तर एक हाथ लो, एक हाथ दो अशी प्रतिक्रिया एका नेटिझनने दिली आहे. तर आयएफएस अधिकारी अब्दुल कय्युम यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत जुना अनुभव शेअऱ केला आहे. त्या व्हिडिओमध्ये एक महिला माकडांना खाऊ घालते आहे. महिलेभोवती अनेक माकडं जमली आहेत आणि त्यांना ही महिला पिझ्झा आणि बर्गर देताना दिसत आहे. माकडांना सवय नसणारे पदार्थ देऊ नका, अशा प्रतिक्रिया त्यावर नागरिकांनी दिल्या आहेत.

)







