मुंबई, 06 एप्रिल: राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मिनी लॉकडाऊन (Weekend Lockdown) लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेक निर्बंध (Maharashtra Night Curfew) घालण्यात आले आहे. आता आणखी एक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहे.
राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत असल्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता 31 ऑगस्टपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी बँका यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा सहकार विभागाने जाहीर केला आहे.
राहुल वैद्य आणि दिशा परमारने गुपचूप लग्न केलं? पाहा VIRAL PHOTO मागील सत्य
यापूर्वी 31 मार्चपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं.
छत्तीसगड चकमकीत 24 जवान शहीद, माओवाद्यांनी शस्त्रसाठ्याचे PHOTOS केले प्रसिद्ध
कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे राज्यात ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यात. त्यानंतर राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका, पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. पण, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 6 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lockdown, Maharashtra, Mumbai, Night Curfew, Pandemic