Home /News /mumbai /

'शिवसेनेचा जन्म संघर्ष करण्यासाठीच'; ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावताच अनिल परब यांची प्रतिक्रिया

'शिवसेनेचा जन्म संघर्ष करण्यासाठीच'; ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावताच अनिल परब यांची प्रतिक्रिया

दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. ईडीने परब यांना साई रिसॉर्ट संदर्भातली सर्व कागदपत्रं घेऊन चौकशीला हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई 23 जून : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने आज गुरुवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे. मंगळवारी आणि बुधवारी ईडीने अनिल परब यांची चौकशी केली. अद्याप त्यांची चौकशी पूर्ण झालेली नाही. अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. ईडीने परब यांना साई रिसॉर्ट संदर्भातली सर्व कागदपत्रं घेऊन चौकशीला हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवसेनेचा ढाण्या वाघ गुवाहाटीतल्या बंडखोर आमदारांना जावून मिळाला, हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा Exclusive Video समोर दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी पत्कारल्याने महाविकास आघाडी सरकारवरच्या (Maha Vikas Aghadi) अस्तित्वावर संकट ओढावलं आहे. कारण शिंदे यांना शिवसेनेच्या आता जवळपास 50 आमदारांनी समर्थन दिलं आहे. यानंतर आता राज्य सरकारच संकटात आलं आहे यावरही अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल परब म्हणाले, 'महाराष्ट्रात जोपर्यंत हे नाट्य सुरू आहे तोपर्यंत मला चौकशीला बोलावलं जाईल, असं दिसत आहे. पण मी चौकशीत सहकार्य करतोय. शिवसेनेचा जन्म संघर्ष करण्यासाठीच झाला आहे आणि शिवसेना तो करेल. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं होतं की ते शासकीय निवासस्थान सोडतील त्यानुसार त्यांनी सोडलेलं आहे. शिवसेना संघर्ष करणारच' एकनाथ शिंदेंसोबत आता नेमके किती आमदार? गुवाहाटीमधल्या संख्येत मोठी वाढ बुधवारी जवळपास आठ तास चौकशी केल्यानंतरही ईडीची चौकशी पूर्ण झालेली नाही. आता पुन्हा अनिल परब यांना ईडीने गुरुवारी सकाळी 11 वाजता पुन्हा चौकशीसाठी बोलवलं आहे. ईडीने त्यांना काही त्यांच्या रिसॉर्टसंबंधी काही कागदपत्रांची यादी दिली असून त्याची गुरुवारी पूर्तता करण्यास सांगितलं आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Anil parab, ED

पुढील बातम्या