Home /News /maharashtra /

एकनाथ शिंदेंसोबत आता नेमके किती आमदार? गुवाहाटीमधल्या संख्येत मोठी वाढ

एकनाथ शिंदेंसोबत आता नेमके किती आमदार? गुवाहाटीमधल्या संख्येत मोठी वाढ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर दाखल होत असताना शिवसैनिक (Shivsena) रस्त्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत, तर दुसरीकडे गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनामध्ये असलेल्या आमदारांची संख्या वाढत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर दाखल होत असताना शिवसैनिक (Shivsena) रस्त्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत, तर दुसरीकडे गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनामध्ये असलेल्या आमदारांची संख्या वाढत आहे. कालपर्यंत मुंबईमध्ये असलेल्या मंत्री गुलाबराव पाटील आणि योगेश कदम यांच्यासह मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना 34 आमदारांची सही असलेलं एक पत्र लिहिलं, या पत्रात राजकुमार पटेल, बच्चू कडू, राजेंद्र पाटील, नरेंद्र भोंडेकर या अपक्ष आमदारांची सही आहे, तर या पत्रावर सही असलेले नितीन देशमुख गुजरातहून महाराष्ट्रामध्ये आले आहे. आज दुपारी हे पत्र नरहरी झिरवळ यांना देण्यात आलं. या पत्रावर नजर टाकली तर नितीन देशमुख वगळले तर शिवसेनेच्या 29 आमदारांची सही आहे. त्यानंतर रात्री उशिरा गुलाबराव पाटील आणि योगेश कदम आल्यामुळे शिवसेना आमदारांची संख्या 31 झाली आहे. मुंबईमध्ये असलेले दीपक केसरकर यांनीही शिवसेनेने भाजपसोबत जावं, ही भूमिका मांडली आहे. या गणितानुसार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 32 तर अपक्ष आणि इतर पक्षांचे 6 असे एकूण 38 आमदार झाले आहेत. मुंबईतून शिवसेनेचा आणखी दोन आमदार गुवाहाटीसाठी निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या या आमदारांची संख्या 34 झाली तरी एकनाथ शिंदे यांना दोन-तृतियांश शिवसेना फोडण्यासाठी आणखी 3 आमदारांची गरज लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 आमदार असतील तर त्यांना वेगळा गट स्थापन करता येईल तसंच कोणत्याही आमदाराला पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही. शिवसेनेचे आमदार शंभुराज देसाई- पाटण संजय शिरसाट- औरंगाबाद नितीन देशमुख- बालापूर (महाराष्ट्रात परत) किशोर पाटील- पाचोरा प्रकाश सुर्वे- मागठाणे लता सोनावणे- चोपडा यामिनी जाधव- भायखळा सुहास कांदे- नांदगाव विश्वनाथ भोईर- कल्याण पश्चिम अनिल बाबर- खानापूर चिमणराव पाटील- एरंडोल शहाजी पाटील- सांगोला शांताराम मोरे- भिवंडी ग्रामीण श्रीनिवास वनगा- पालघर बालाजी किणीकर- अंबरनाथ रमेश बोरणारे- वैजापूर प्रदीप जयस्वाल- औरंगाबाद संजय रायमुलकर- मेहकर महेंद्र दळवी- अलिबाग महेंद्र थोरवे- कर्जत भरत गोगावले- महाड संदीपान भुमरे- पैठण तानाजी सावंत- परांडा बालाजी कल्याणकर- नांदेड अब्दुल सत्तार- सिल्लोड प्रताप सरनाईक- ओवळा माजीवाडा ज्ञानराज चौघुले- उमरगा संजय गायकवाड- बुलडाणा कोरेगाव- महेश शिंदे एकनाथ शिंदे- कोपरी-पाचपाखाडी प्रहार राजकुमार पटेल बच्चू कडू अपक्ष राजेंद्र पाटील- शिरोळ नरेंद्र भोंडेकर- भंडारा मंजुळा गावित चंद्रकांत पाटील आज गुवाहाटीमध्ये दाखल झालेले शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील योगेश कदम दीपक केसरकर (गुवाहाटीमध्ये नाहीत पण भाजपसोबत जायच्या बाजूने)
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या