मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत लोकल सुरू करण्यावरून अनिल देशमुखांचा रेल्वे विभागावर गंभीर आरोप, म्हणाले...

मुंबईत लोकल सुरू करण्यावरून अनिल देशमुखांचा रेल्वे विभागावर गंभीर आरोप, म्हणाले...

'मुंबईत लोकल सेवा ही ठराविक वेळेत उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. जेणे करून मुंबईकरांचा प्रवास हा आणखी सोईस्कर होईल. पण...'

'मुंबईत लोकल सेवा ही ठराविक वेळेत उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. जेणे करून मुंबईकरांचा प्रवास हा आणखी सोईस्कर होईल. पण...'

'मुंबईत लोकल सेवा ही ठराविक वेळेत उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. जेणे करून मुंबईकरांचा प्रवास हा आणखी सोईस्कर होईल. पण...'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 01 नोव्हेंबर : गेल्या सात महिन्यांपासून ठप्प असलेली मुंबई लोकल (Mumbai Local) सेवा सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने  (maha vikas aghadi government)प्रयत्न सुरू असून याबद्दल केंद्र सरकारला पत्रही पाठवण्यात आले आहे. पण, 'रेल्वे विभाग या कामात खोडा घालत आहे', असा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे.

मुंबईत कोरोनाचा लाट आता ओसरत चाललेली आहे. त्यामुळे मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी अशी मागणी सर्वच स्तरातून होतं आहे. राज्य सरकारनेही नवरात्रीपासून महिलांसाठी लोकल सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता सर्वांसाठीच लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. दैनिक महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारने मुंबईत लोकल सेवा सुरू करावी, याबद्दले रेल्वे विभागाला पत्र पाठवले आहे. पण, रेल्वे विभागाकडून लोकल सेवा सुरू करण्याच्या कामात खोडा घालत आहे. सर्व सामान्य मुंबईकरांना दिलासा देण्याची गरज आहे, पण यातही राजकारण केले जात आहे', असा आरोपच गृहमंत्री देशमुख यांनी केला आहे.

काय सांगता! मोदी सरकार देणार तुमच्या मुलीच्या लग्नासाठी 40 हजार? वाचा सत्य

'मुंबईत लोकल सेवा ही ठराविक वेळेत उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. जेणे करून मुंबईकरांचा प्रवास हा आणखी सोईस्कर होईल. ठराविक वेळेमुळे गर्दीही टाळता येईल. त्यामुळे ठराविक वेळेबद्दल संपूर्ण माहिती ही रेल्वे विभागाला देण्यात आली आहे. रेल्वे विभागाने आता मुंबईकरांना दिलासा दिला पाहिजे, यात कोणतेही राजकारण करू नये', असा टोलाही देशमुख यांनी लगावला.

विशेष म्हणजे, सर्वच प्रवाशांना ठराविक काळात रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी अशी विनंती राज्य सरकारने रेल्वेला विभागाकडे केली आहे. पहाटे पहिल्या लोकल पासून सकाळी 7.30 पर्यंत सर्वांना लोकल प्रवास करण्यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 4.30 पर्यंत या वेळेतही सर्वांना प्रवास मुभा द्यावी ही मागणी राज्य सरकारची रेल्वे प्रशासनास केली.

VIDEO : मंदिराची चावी देण्यास नकार, दलित सिक्युरिटी गार्डला पुजाऱ्याकडून मारहाण

परंतु, मुंबईत जर  लोकल सुरू केल्या तर गर्दीचे नियोजन कसे करणार, अशी विचारणा रेल्वे विभागाने राज्य सरकारकडे केली आहे. याबद्दल राज्य सरकार आणि रेल्वे विभागाने संयुक्त बैठक घेऊन, गर्दीच्या नियोजनावर तोडगा काढावा, असा सल्लाही रेल्वे विभागाने दिला. मात्र, तुर्तास रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करता येणे शक्य नाही, असंही रेल्वे विभागाने स्पष्ट केले.

First published: