चेन्नई, 01 नोव्हेंबर : मंदिराची चावी न दिल्याच्या रागातून पुजाऱ्यानं बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चावी देण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं आणि सर्वांनी मिळून मंदिराची सुरक्षा करणाऱ्या दलित सिक्युरिटी गार्डला बेदम मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
तिरुचेंदूर श्री सुब्रमण्यम स्वामी देवस्थानम मंदिराबाहेर ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. पुरोहितांनी चावी मागितल्यानंतर गार्डनं देण्यास नकार दिला आणि त्याच रागातून त्यांनी दलित गार्डला बेदम मारहाण केली अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल कऱण्यात आला नाही.
Tamil Nadu temple priest hits Dalit security guard for denying to provide main gate keys without the permission of the concerned authorities. #Tiruchendur #DalitLivesMatter pic.twitter.com/vFZP8Uyf3Z
— Bharathi S. P. (@aadhirabharathi) November 1, 2020
हे वाचा-...आणि भरसभेत भाजप नेते ज्योतिरादित्य म्हणाले, 'पंजासमोरील बटन...', Video व्हायर
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गार्डनं अधिकाऱ्यांनी परवानगी न देता पुरोहितांना चावी देण्यास नकार दिला. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. मारहाण करणाऱ्या पुजाऱ्याचं नाव जयमालिनी कुमार असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की गार्ड आणि पुरोहितांमध्ये खूप बाचाबाची होते. हा वाद शिगेला पोहोचतो आणि त्यानंतर धक्काबुक्की आणि बेदम मारहाण केली जाते.
चावी न दिल्याच्या रागातून पुजाऱ्याने या सिक्युरिटी गार्डला कामावरून काढून टाकण्याची धमकी देखील देत असल्याचा आरोप आहे. या गार्डला तीन मुली आहेत. नोकरी गेली तर पोट कसं भरायचा हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नोकरीवरून काढू नये ही भीती आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र त्यांनी एफआयआरची प्रत दिली नाही असंही सिक्युरिटी गार्डनं सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tamil nadu, Viral video.