मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /“बार ओनर्सकडून पैसे गोळा करायला अनिल देशमुखांनी सांगितले होते का?” सचिन वाझे म्हणाला, याबाबत मला काही आठवत नाही

“बार ओनर्सकडून पैसे गोळा करायला अनिल देशमुखांनी सांगितले होते का?” सचिन वाझे म्हणाला, याबाबत मला काही आठवत नाही

Sachin Vaze statement : मुंबईतील बार चालकांकडून अनिल देशमुख यांनी पैसे गोळा करण्यास सांगितले होते का? या प्रश्नावर सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर जबाब दिला आहे.

Sachin Vaze statement : मुंबईतील बार चालकांकडून अनिल देशमुख यांनी पैसे गोळा करण्यास सांगितले होते का? या प्रश्नावर सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर जबाब दिला आहे.

Sachin Vaze statement : मुंबईतील बार चालकांकडून अनिल देशमुख यांनी पैसे गोळा करण्यास सांगितले होते का? या प्रश्नावर सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर जबाब दिला आहे.

मुंबई, 14 डिसेंबर : बार ओनर्सकडून पैसे गोळा करायला अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सांगितले होते का? या प्रश्नावर सचिन वाझे याने चांदीवाल आयोगासमोर दिलेल्या उत्तराने सर्वचजण बुचकुळ्यात पडले आहेत. सचिन वाझे याने उत्तर देत म्हटलं, याबाबत मला काही आठवत नाही. सचिन वाझे याच्या या उत्तराने हे स्पष्ट होत नाहीये की अनिल देशमुख यांनी त्याला बार ओनर्सकडून पैसे गोळा करायला सांगितले होते की नाही. अर्थात एक प्रकारे परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांना दुजोरा दिलाय का? असा प्रश्न निर्माण होतोय. (Did Anil Deshmukh asked you to collect money from Bar onwers? Sachin Vaze gives answer on this)

तसेच अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव कुंदन शिंदे यांनी आपल्याला कधी पैशांची ॲाफर केली होती का? पैसे मागितले होते का? बार ओनर्स कडून पैसे गोळा करायला सांगितले होते का? या प्रश्नांवर सचिन वाझे यांना मला आठवत नाही असे उत्तर दिले. तर याच उत्तराला प्रतिप्रश्न करत अनिल देशमुख यांच्या वकीलांनी विचारले की कुंदन शिंदे यांनी तुम्हाला काहीच दिले नाही म्हणुन आठवत नाही का? त्यावर सचिन वाझे यांनी हो असं उत्तर दिल्याने देखील सर्वजण बुचकुळ्यात पडले होते. एक नजर टाकूयात नेमके चांदिवाल आयोगात आज काय झाले.

प्रश्न 1 : आपण सीआययूमध्ये ज्या केसचा तपास केला त्या केसमध्ये आरोपपत्र दाखल झाल आहे का?

उत्तर : माझ्या काळातील सर्व केस मध्ये आरोपपत्र दाखल केले आहेत.

प्रश्न 2 : ज्या या केसमध्ये आपण आरोपपत्र दाखल केलेत. या केसमध्ये आपण वरिष्ठांच्या हस्तक्षेपाशिवाय आरोप पत्र दाखल केलंत का?

उत्तर : हो

प्रश्न 3 : राजकीय व्यक्तींच्या आदेशाशिवाय त्यांच्या आदेशाची दखल न घेता आरोप पत्र दाखल केले होते का?

उत्तर : कोणत्याही राजकीय व्यक्तींनी माझ्या तपासत हस्तक्षेप केला नाही.

प्रश्न 4 : याचा अर्थ कोणत्याही सत्ताधारी व्यक्तीने तुमच्या तपासत हस्तक्षेप केला नाही.?

उत्तर : हो

प्रश्न 5 : हे आरोपपत्र सादर करताना कोणत्याही प्रकारचा गृह मंत्रालयातून काही संबंध होता का?

उत्तर : नाही

वाचा : भाजपच्या आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

प्रश्न 6 : इतर कामात ग्रहमंत्रालयातून कधी ढवळाढवळ झाली होती का ? तुम्हाला कधी पैशाबाबत ऑफर केली का ?

उत्तर : नाही

प्रश्न 7 : कधी गृहमंत्री यांना पैसे द्यायची वेळ आली होती का?

उत्तर - नाही, माझ्यातर्फे नाही

प्रश्न 8 : तुम्ही कधी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पैसे दिलेत का?

उत्तर - नाही

प्रश्न 9 : तुम्ही अनिल देशमुख आणि त्यांच्या जवळच्या सहकार्यांना कधी पैसे दिलेत का

उत्तर - नाही

वाचा : राहुल गांधींच्या सभेसाठीची याचिका काँग्रेसकडून सुनावणीपूर्वीच मागे

प्रश्न 10 : तुम्ही अनिल देशमुख आणि त्यांच्या जवळच्या सहकार्यांना कधी पैसे दिलेत का?

उत्तर : नाही

प्रश्न 11 : तुम्ही कुंदन शिंदे यांना ओळखता का ? तुम्ही कुंदन शिंदे यांना कधी ही पैसे दिलेत?

उत्तर : मला आठवत नाही

प्रश्न 12 : तुम्ही कुंदन शिंदे यांना काही दिल नाही म्हणून तुम्हाला काही आठवत नाही?

उत्तर - हो

प्रश्न 13 : अनिल देशमुख यांच्याकडील अधिकृत किंवा अनधिकृत व्यक्तींकडून तुम्हाला काही डिमांड करण्यात आलीये का?

उत्तर : नाही

प्रश्न 14 : अनिल देशमुख यांच्या जवळच्या व्यक्तींनी कधी पैशांची डिमांड केलीये का?

उत्तर : नाही

वाचा : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, 'त्या' बार परवानामुळे कारणे दाखवा नोटीस

प्रश्न 15 : अनिल देशमुख यांच्याकडून तुम्हाला कधी कोणी बार आणि हॉटेल मालकांकडून पैसे कलेक्टर करा असे सांगण्यात आले होते का?

उत्तर : मला आठवत नाही

प्रश्न 16 : तुम्ही बार किंवा हॉटेल मालकांकडून पैसे गोळा केलेत का?

उत्तर : नाही

प्रश्न 17 : याचा अर्थ बार ओनर्सकडून तुम्ही कधी पैसे गोळा केलेच नाहीत ?

उत्तर : हो

First published:

Tags: Anil deshmukh, Sachin vaze