मुंबई, 14 डिसेंबर : एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यांच्या नावे असलेल्या बार परवाना (Bar licence) प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वयाच्या 17व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (excise department) कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली आहे.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर आरोप केला होता की, अवघ्या 17व्या वर्षी त्यांना बारचा परवाना मिळाला होता. नवी मुंबईत असलेला सदगुरू रेस्ट्रो बारचा परवाना हा समीर वानखेडे यांच्या नावावर आहे. समीर वानखेडे यांच्या नावावर हा बारचा परवाना झाला त्यावेळी त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते. अल्पवयीन असतानाही पारचा परवाना कशा मिळाला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Thane unit of Maharashtra Excise Department has issued a show-cause notice to Navi Mumbai-based bar of NCB Mumbai Zonal Director Sameer Wankhede for furnishing wrong information in his application for the licence in 1997: Office of Thane collector pic.twitter.com/qKYuw1WPxv
— ANI (@ANI) December 14, 2021
27 ऑक्टोबर 1997 रोजी समीर वानखेडेंच्या नावे बारचा परवाना काढण्यात आला होता. बारच्या परवान्यासाठी किमान 21 वयाची अट आहे. मात्र, असे असतानाही त्यांना बारचा परवाना मिळाला. समीर वानखेडे यांचे वडील त्यावेळी उत्पादन शुल्क विभागाक कार्यरत होते. याप्रकरणी आता समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तुमच्या नावे असलेला बार परवाना रद्द का करु नये अशी विचारणा करण्यात आली आहे.
वाचा : 'लवकरच एका भाजप नेत्याला अटक होणार' नवाब मलिकांचा रोख कुणाकडे?
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने या प्रकरणी कारवाईचे निर्देश दिल्याचं बोललं जात आहे. या पु्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर महाराष््टर प्रतिबंध कायद्याच्या कलम 54 नुसार कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच त्यांच्या नावावर असलेला बारचा परवाना सुद्धा रद्द होऊ शकतो.
मलिकांनी केला होता आरोप
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी वानखेडे आणि त्यांच्या वडिलांवर आणखी एक नवा आरोप केला होता. वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात (Excise Department) कार्यरत असताना त्यांनी आपल्या अल्पवयीन (Minor) मुलाच्या नावाने दारुच्या दुकानाचा परवाना (Liquor shop License) दिला. संबंधित बारचा परवाना हा 1997 साली जारी करण्यात आला होता. त्यावेळी समीर यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालं नव्हतं, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Nawab malik, NCB