मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai: राहुल गांधींच्या मुंबईतील सभेवर प्रश्नचिन्ह, सभेसाठीची याचिका काँग्रेसकडून मागे

Mumbai: राहुल गांधींच्या मुंबईतील सभेवर प्रश्नचिन्ह, सभेसाठीची याचिका काँग्रेसकडून मागे

राहुल गांधींच्या मुंबईतील सभेसाठी हायकोर्टात केलेली याचिका काँग्रेसकडून मागे घेण्यात आली आहे.

राहुल गांधींच्या मुंबईतील सभेसाठी हायकोर्टात केलेली याचिका काँग्रेसकडून मागे घेण्यात आली आहे.

राहुल गांधींच्या मुंबईतील सभेसाठी हायकोर्टात केलेली याचिका काँग्रेसकडून मागे घेण्यात आली आहे.

मुंबई, 14 डिसेंबर : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांची शिवाजी पार्कवर एक रॅली (Rahul Gandhi rally in Shivaji Park Mumbai) आयोजित करण्यात आली होती. 28 डिसेंबर हा काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे हा दिवस काँग्रेससाठी खूप विशेष असणार आहे. मुंबई काँग्रेसने या दिवशी शिवाजी पार्क येथे सभा घेता यावी म्हणून मुंबई महापालिकेला पत्र पाठवलं होतं. पण महापालिकेने नगरविकास विभागाकडे बोट दाखवलं आहे. अखेर प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने काँग्रेसने राहुल गांधींच्या सभेसाठी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) धाव घेतली होती. पण आता काँग्रेसकडून ही याचिका मागे घेण्यात आली आहे.

न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी बिनशर्त याचिका मागे घेतली आहे. मात्र सरकारने परवानगी दिली की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. दरम्यान आज दुपारी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हे पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत.

काँग्रेसने याचिकेत नेमकं काय म्हटलं होतं?

काँग्रेसने मुंबई महापालिकेकडे पत्राद्वारे याबाबत विनंती करण्यात आली होती. पण मुंबई महापालिकेने या पत्राला उत्तर देत नगरविकास विभागाकडे याचे अधिकार असल्याचं सांगितलं होतं. पण नगरविसाक विभागाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे मुंबई काँग्रेसने थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. काँग्रेसने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत 22 ते 28 डिसेंबर दरम्यान सभेसाठी परवानगी देण्यात यावी. 22 ते 27 डिसेंबरपर्यंत तयारी आणि 28 डिसेंबरला सभेसाठी परवानगी मिळावी, अशी विनंती केली आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात येत्या 28 डिसेंबरला पहिलीच सभा होणार आहे. याआधी 2018 साली काँग्रेसने राहुल गांधी यांना शिवाजी पार्क येथे सभा घेऊ द्यावी, अशी विनंती केली होती. पण त्या सभेची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर येत्या 28 डिसेंबरला राहुल गांधींची सभा होण्याची शक्यता आहे. तसेच याआधी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात 2003 आणि 2006 साली काँग्रेसची मुंबईत सभा आयोजित करण्यात आली होती.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची शनिवारी मुंबईच्या चांदिवली येथे सभा घेतली होती. विशेष म्हणजे एमआयएमच्या या सभेला प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही एमआयएमकडून सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे ही सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता काँग्रेसच्या सभेला राज्य सरकार परवानगी देणार का? हे पहावं लागेल.

First published:

Tags: Rahul gandhi, Shivaji park, काँग्रेस