मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

100 कोटी वसुली प्रकरणाला नवे वळण CBI विरोधात राज्य सरकाराची हायकोर्टात धाव!

100 कोटी वसुली प्रकरणाला नवे वळण CBI विरोधात राज्य सरकाराची हायकोर्टात धाव!

 राज्य सरकारच्या या भूमिकेवर CBI ने कोर्टात नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या तपासात अडथळे आणण्यासाठी राज्य सरकार समांतर तपास करत आहे.

राज्य सरकारच्या या भूमिकेवर CBI ने कोर्टात नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या तपासात अडथळे आणण्यासाठी राज्य सरकार समांतर तपास करत आहे.

राज्य सरकारच्या या भूमिकेवर CBI ने कोर्टात नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या तपासात अडथळे आणण्यासाठी राज्य सरकार समांतर तपास करत आहे.

मुंबई, 17 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshumkh) यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणावरुन केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहे. राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे (State Chief Secretary Sitaram Kunte)  आणि पोलीस महासंचालक संजय पांडे (Director General of Police Sanjay Pandey) यांना समन्स बजावल्या प्रकरणी राज्य सरकारने सीबीआयविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.

100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप झाले. या प्रकरणावरून केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकार असा संघर्षही रंगला आहे. आता  CBI च्या समन्स विरोधात राज्य सरकारने हायकोर्टात धाव घेतली आहे.  राज्य सरकारच्या या भूमिकावर सीबीआयने आक्षेप घेतला आहे.

जगाच्या पाठीवरील दुर्मिळ घटना! हिऱ्याच्या आत सापडलेल्या खनिजाने शास्त्रज्ञ हैराण

राज्य सरकारच्या या भूमिकेवर CBI ने कोर्टात नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या तपासात अडथळे आणण्यासाठी राज्य सरकार समांतर तपास करत आहे.   अनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरणी राज्य सरकार करत असलेल्या समांतर तपासाबाबत CBI ने कोर्टात नाराजी व्यक्त केली असून 'आमच्या तपासाला राज्य सरकार एक प्रकारे विरोध करत आहे' असं सीबीआयचं म्हणणं आहे. तर 'राज्य सरकारला विरोध करण्याचा अधिकार आहे का?' असा सवालच सीबीआयने कोर्टात विचारला आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला. देशमुखांनी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं, असा आरोपही पत्रात करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सध्या सीबीआय करत आहे. याच तपासाचा भाग म्हणून साक्ष नोंदवण्यासाठी सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांना सीबीआयकडून समन्स बजावण्यात आले आहेत.

थुकरट वाडीत हजेरी लावणार बॉलिवूडमधील हे क्यूट कपल

पण, संजय पांडे आणि सीताराम कुंटे यांनी सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिला. तसंच दोन्ही अधिकाऱ्यांनी यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीबीआयसोबत चर्चा देखील केली होती. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांनी सीबीआयला विनंती केली आहे की, जबाब नोंदवायचा असल्यास कार्यालयात यावं' असं सांगितलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

First published:

Tags: Anil deshmukh, Sitaram kunte, महाराष्ट्र