मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

थुकरट वाडीत हजेरी लावणार बॉलिवूडमधील हे क्यूट कपल

थुकरट वाडीत हजेरी लावणार बॉलिवूडमधील हे क्यूट कपल

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मराठी शो चला हवा येऊ द्या (upcoming episode chala hawa yeu da )गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.आता या शोमध्ये बॉलिवूड विश्वातील एक प्रेमळ जोडी हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 17 नोव्हेंबर- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मराठी शो चला हवा येऊ द्या (upcoming episode chala hawa yeu da )गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील कलाकारांच्या विनोदी शैलीचा चाहता वर्ग मोठा आहे. निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे श्रेया बुगडे, सागर कारंडे आणि कुशल बद्रिके ही चला हवा येऊ द्या ची टीम वेगवेगळे विनोदी स्किट सादर करत असते. वेगवेगळ्या नाटक, मालिका आणि चित्रपटांमधील कलाकार या शोमध्ये येत असतात. आता या शोमध्ये बॉलिवूड विश्वातील एक प्रेमळ जोडी हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

ही जोडी म्हणजे दुसरी तिसरी कोणाची नसून आपला सर्वांचा आवडता मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया डिसूझा यांची आहे. आता रितेश आणि जेनेलिया डिसूझा- देशमुख (Riteish Deshmukh and Genelia D'Souza) या शोमध्ये का येणार आहेत यामगचं कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र या दोघांना या शोमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र उत्सुक आहेत. यासोबतच चला हवा देऊ द्या मधील कलाकर थुकरट वाडीत त्यांचं कसं स्वागत करणार याची देखी सर्वांना अतुरता लागली आहे.

वाचा : क्रांती रेडकरच्या बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या Tweet वर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखले जातं. ही जोडी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव असते. विविध फोटो, व्हीडीओ यामुळे सोशल मीडियावर यांचा बोलबाला असतो. ही जोडी 18 वर्षे झालं एकमेकांसोबत आहेत. या दोघांना दोन मुलं देखील आहेत. त्यांच्यासोबत देखील ही काही रील शेअर करत असतात. 9 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाला 9 वर्षे झाले आहेत.

दोघेही 9 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्नाच्या बंधनात अडकले. अलीकडे काही महिन्यातच ब्रेकअप होताता मात्र या दोघांनी आधी 9 वर्षे आता संसारीची यशस्वी 9 वर्षे असी 18 वर्षे एकत्र पूर्ण केली आहेत. आजही त्यांच्यातील प्रेम दिसतं. दोघांची केमेस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडते.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Ritesh deshmukh, Zee marathi serial