मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

जगाच्या पाठीवरील दुर्मिळ घटना! हिऱ्याच्या आत सापडलेल्या खनिजाने शास्त्रज्ञ हैराण

जगाच्या पाठीवरील दुर्मिळ घटना! हिऱ्याच्या आत सापडलेल्या खनिजाने शास्त्रज्ञ हैराण

जगाच्या पाठीवरील अनेक दुर्मिळ घटना घडत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्याने शास्त्रज्ञ देखील हैराण झाले आहेत. या संशोधकांना हिऱ्याच्या (Diamond) आत एक दुर्मिळ खनिज (Mineral) आढळले आहे.

जगाच्या पाठीवरील अनेक दुर्मिळ घटना घडत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्याने शास्त्रज्ञ देखील हैराण झाले आहेत. या संशोधकांना हिऱ्याच्या (Diamond) आत एक दुर्मिळ खनिज (Mineral) आढळले आहे.

जगाच्या पाठीवरील अनेक दुर्मिळ घटना घडत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्याने शास्त्रज्ञ देखील हैराण झाले आहेत. या संशोधकांना हिऱ्याच्या (Diamond) आत एक दुर्मिळ खनिज (Mineral) आढळले आहे.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 17 नोव्हेंबर : आतापर्यंत पृथ्वीवरील (Earth) अनेक रहस्य उलगडण्यात संशोधकांना यश आलं आहे. तरीही आजही अनेक अशा गोष्टी आहेत, ज्याबद्दल शास्त्रज्ञ अनभिज्ञ आहेत. कधीतरी एखादी वस्तू अशा ठिकाणी सापडते की ज्याने शास्त्रज्ञही अचंबित होतात. अशीच एक घटना समोर आली आहे. यावेळी शास्त्रज्ञांना असे एक खनिज सापडले आहे जे याआधी कधीही पाहिले गेलेले नाही. विशेष म्हणजे हे खनिज अशा ठिकाणी सापडले, ज्याची कधी कल्पना केली नव्हती. हे खनिज हिऱ्याच्या आत आढळले आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अगदी खोलवर हे आढळले, ज्याला डेव्हमाओइट (Davemaoite) असे नाव देण्यात आले आहे.

कशी परिस्थितीत बनतो

पृथ्वीच्या खोल खाणीत आढळणारे हे खनिज कॅल्शियम सिलिकेट पेरोवस्काइट आहे. खालच्या आवरणात आढळणारा उच्च दाब आणि तापमानाच्या परिस्थितीत हे तयार होते. भूभौतिकशास्त्रज्ञ हो क्वांग (डेव्ह) माओ यांच्या नावावरून या खनिजाला नाव देण्यात आले आहे. त्यांनी उच्च दाबाच्या घटकांचा अभ्यास केला आहे. या खनिजामध्ये क्रिस्टल रचना आहे जी केवळ उच्च तापमान आणि दाबाच्या परिस्थितीत पृथ्वीचा गाभा आणि कवच यांच्यातील थरामध्ये आढळते.

अशी खनिजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळत नाहीत

अशी खनिजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सापडत नसल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी फार पूर्वीच बांधला होता. सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात संशोधकांनी सांगितले की, कॅल्शियम सिलिकेट पेरोवस्काइट (CaSiO3) खालच्या आवरणाच्या अत्यंत महत्त्वाच्या भू-रासायनिक अवस्थेत तयार होते. कारण त्याचे घटक वरच्या आवरणाशी जुळत नाहीत.

Coal : भारतासाठी 'कोळसा' अवघड जागेचं दुखणं! सांगताही येईना अन् दाखवताही येईना

तीन विशेष आयसोटोप

या खनिजाच्या रासायनिक विश्लेषणातून असे दिसून आले आहे की त्यात युरेनियम, थोरियम आणि पोटॅशियमचे आयसोटोप आहेत. पेपरमध्ये असे म्हटले आहे की डेवमाओइटमध्ये तीन प्रमुख उष्णता निर्माण करणारे घटक असू शकतात आणि जुने प्रयोग दर्शवितात की युरेनियम आणि थोरियमचा त्यात समावेश आहे. हे घटक पृथ्वीच्या खालच्या आवरणात उष्णता निर्माण करतात.

एका हिऱ्या आत खनिज

नेवाडा विद्यापीठाच्या भूविज्ञान विभागाचे ऑलिव्हर शॉनर यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले. संशोधकांनी बोत्स्वानाच्या ओरापा खाणीत सापडलेल्या हिरव्या अष्टकोनी हिऱ्याचा अभ्यास केला, ही जगातील सर्वात मोठी खुली हिऱ्याची खाण आहे.

OMG! एका अंगठीवर तब्बल 7801 हिरे; जगात भारी भारतातली Diamond ring

ही बातमी धक्कादायक का होती?

नेचरच्या म्हणण्यानुसार, हा हिरा कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मिनरलॉजिस्ट जॉर्ड रॉसमन यांना विकला गेला होता. शॉनरने या हिऱ्यातील खनिजांचा शोध लावला. या खनिजाचा शोध धक्कादायक असल्याचे त्यांनी लाइव्ह सायन्सला सांगितले. अशी खनिजे इतर परिस्थितींमध्ये त्यांची रासायनिक रचना गमावतात.

हा नवीन शोध वैज्ञानिक समुदायासाठी महत्त्वाचा आहे. कारण या खनिजाने अनेक दशकांपूर्वी पृथ्वीच्या बाहेर आलेली त्याची जुनी रचना गमावलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तो पृथ्वीच्या खोलीत सापडलेल्या हिऱ्याच्या आत होता, पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसलेला हा दुसरा उच्च-दाब आवरण सिलिकेट आहे. याला आता नवीन आंतरराष्ट्रीय खनिज संघ आयोगाने वैज्ञानिक नामांकनासाठी स्वीकारले आहे.

First published:

Tags: Diamond, Earth, Scientist