mumbauमुंबई, 19 मार्च: कारचोरी किंवा बाइक चोरीच्या अनेक घटना समोर येतात. पण मुंबईत एका चोरांच्या टोळक्याने चक्क ऑटोरिक्षांची (Auto Rickshaw Theft) चोरी केली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या टोळीचा पर्दाफाश केला आहे. अंधेरी पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपीना अटक केली असून चोरीच्या एकूण 38 रिक्षा (38 Auto Seized) जप्त केल्या आहे. या ऑटो रिक्षांची किंमत साधारण 75 लाख 80 हजार रुपये इतकी आहे.
अंधेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंधेरी कुर्ला रोडवर 13 मार्च रोजी रात्री रिक्षाचालक पप्पू राजाराम जयस्वार (वय 37 वर्षे राहणार कृष्णा नगर) याने अंधेरी पूर्वमध्ये मरोळ मेट्रो स्थानकाजवळ रिक्षा उभी करून ठेवली होती. रिक्षा याठिकाणी उभी करून तो घरी गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रिक्षाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तो ज्याठिकाणी रिक्षा उभी केली होती त्याठिकाणी पोहोचला. पण तिथे पोहोचल्यावर असे लक्षात आले की, त्याठिकाणी रिक्षाच नव्हती. आजूबाजूला शोध घेतला पण रिक्षा न मिळाल्याने या रिक्षाचालकाने अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीनुसार पोलिसांनी रिक्षेचा शोध घेण्यासाठी आणि आरोपीना पकडण्यासाठी एका पथक तयार केलं. या पथकाला सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाजूतून असं लक्षात आलं की, एक रिक्षा संशयितरित्या फिरते आहे. पोलिसांनी पाळत ठेऊन त्या रिक्षा चालकाला दिंडोशी येथे सापळा लावून अटक केली.
(हे वाचा-'वाझेंचा मनसुख हिरेन होईल',भीती व्यक्त करत राणा दाम्पत्याने NIAकडे केली ही मागणी)
अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाची चौकशी केली असता या रिक्षा चोरून वसई या ठिकाणी एका गॅरेजमध्ये ठेवल्या जात असल्याची माहिती मिळाली. एवढंच नव्हे तर त्या रिक्षांचा रजिस्टर नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर बदलून त्या पुन्हा मुंबईत आणून भाड्याने देण्याचा काळा धंदा ही टोळी करत असे.
(हे वाचा-Zomato डिलिव्हरी बॉय प्रकरणाला नवं वळण, आरोप करणाऱ्या हितेशाचं आता वेगळंच विधान)
अंधेरी पोलिसांनी वसईतील गॅरेज मधून गॅस कटर, सिलेंडर तसेच नकली नंबरच्या पाट्या आणि इतर साहित्य जप्त केले आहे. यात दोन मुन्नातीयाज शेख (वय 61 वर्षे राहणार पवई) आणि खुशनुयार मुख्तार शेख (वय 37 वर्षे) यांना कुर्ल्यातील जरीमरी भागातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या आरोपींनी ठाणे, नवी मुंबई, पालघर अशा ठिकाणाहून रिक्षा चोरी केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. तसंच रेड्डी यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे बुके देऊन कौतुक देखील केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Autorickshaw driver, Crime news, Maharashtra, Mumbai, Mumbai police, Robbery Case, Theft