मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

असं असतं राजकारण! शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे तिन्ही नेते आले एकत्र

असं असतं राजकारण! शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे तिन्ही नेते आले एकत्र

आज जळगावमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (Jalgaon District Bank Election) बैठकी निमित्त कट्टर विरोधक नेते पुन्हा एकत्र आहे.

आज जळगावमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (Jalgaon District Bank Election) बैठकी निमित्त कट्टर विरोधक नेते पुन्हा एकत्र आहे.

आज जळगावमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (Jalgaon District Bank Election) बैठकी निमित्त कट्टर विरोधक नेते पुन्हा एकत्र आहे.

  • Published by:  sachin Salve

जळगाव, 27 सप्टेंबर : माजी मंत्री एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी राष्ट्रवादीत (ncp) प्रवेश केल्यानंतर जळगावमध्ये चांगलाच राजकीय आखाडा पाहण्यात मिळाला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं (shvisena) भाजपचा (bjp) बालेकिल्ला पार पोखरून काढला आहे. त्यानिमित्ताने भाजप आणि सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. पण, आज तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आल्याचे पाहून जळगावकरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कोरोनामुळे लांबलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकांचा (District Bank Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. आज जळगावमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या बैठकी निमित्त कट्टर विरोधक नेते पुन्हा एकत्र आहे.

जळगाव जिल्हा बँकेचे संदर्भात अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil), भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन (girish mahajan), राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse), माजी मंत्री गुलाबराव देवकर (gulabrao devkar), भाजप आमदार सुरेश भोळे, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, शिवसेना आमदार किशोर पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट संदीप पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थित बैठक पार पडली.

रशियात जबरदस्त हिमवृष्टी; भर शहरात दीड फुटांपर्यंत साठलाय बर्फ! पाहा PHOTOS

जळगाव जिल्हा बँकेची आगामी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आज जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी बैठक घेतली. एखाद-दुसर्‍या जागेचा अपवाद वगळता बिनविरोध होण्याबाबत एकमत झाल्याची माहिती आमदार गिरीश महाजन यांनी दिली.

तर, जळगाव जिल्हा बँकेची आगामी निवडणूक ही शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे चारही पक्ष एकत्रीतपणे लढविणारअसल्याची माहिती पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांनी दिली. बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे पद प्रत्येक पक्षाला सव्वा वर्षे मिळेल, अशा दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांनी दिली.

तसंच, 'सहकारात राजकारण असू नये या भूमिकेतून गेल्या पंचवार्षिकला सर्वपक्षीय पॅनलने जिल्हा बँकेत यश मिळविले. गेल्या पाच वर्षात रोहिणी खडसे यांनी चांगले नेतृत्व केल्यामुळे बँक उर्जीतावस्थेला आली असून आता आगामी निवडणूक देखील सर्वपक्षीय पॅनल करून लढविण्यात येणार आहे, अशी माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली.

Maharashtra Health Department Exam:टोपेंनी विद्यार्थ्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच गुलाबराव पाटील यांनी भाजपला चांगलाच दणका दिला होता. भाजपचे 11 नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला आहे. हे 11 नगरसेवक आधी एकनाथ खडसे यांचे समर्थक होते. त्यानंतर हसत खेळत आज तिन्ही नेते समोरासमोर आले.

सर्वपक्षीय पॅनल बैठकीत जिल्हा बँकेच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्यात जमा आहे. पण, निवडणुकीच्या निमित्ताने सर्व पक्षीय नेते एकत्र आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

First published:

Tags: Eknath khadse, Girish mahajan, Gulabrao patil, एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील