मुंबई, 17 जुलै : शिवसेनेचे बंडखोर नेते संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. जो आपल्याला गद्दार म्हणेल त्याच्या कानाखाली आवाज काढा, अशी चिथावणी त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना दिली होती. त्यानंतर आता शिवसेनेतील एका रणरागीणीने त्यांना खुलं चॅलेंज दिलं आहे. शिवसैनिक तोच आहे जो ठाकरे आणि मातोश्रीसोबत आहे. ज्या ज्या लोकांनी मातोश्रीला धोका दिला ते माझ्यासाठी गद्दारच आहे. त्यामुळे मी एकदा नाही तर लाख वेळा गद्दार म्हणणार. संतोष बांगर यांच्यात हिम्मत असेल तर माझ्या कानाखाली त्यांनी मारावी. त्यांच्या समर्थकांना मला फोन करायला सांगण्यापेक्षा, मला फोन करुन त्यांनी धमकी द्यावी, असं खुलं आव्हान शिवसेनेची रणरागिणी अयोध्या पोळ यांनी दिलं आहे. काल कार्यकर्त्यांशी बोलताना आमदार संतोष बांगर यांनी तीव्र शब्दांचा वापर केला होता. आपण मरेपर्यंत शिवसैनिक राहणार आहोत. पण आपल्याला का रे करत असेल तर त्यांच्या कानाखाली जाळ काढा, असं संतोष बांगर संतापून म्हणाले होते. सेनेच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांनीही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अहो गद्दार संतोष बांगर! रेखा देवकाते नावाच्या अशी किती महिला आहेत तुमच्या समर्थक? जी ती महिला फोन करुन धमक्या देत आहे ती स्वतःचे नाव "रेखा देवकाते"च का सांगते? अहो बांगर तुम्ही अयोध्याला इतके घाबरलात का? कालपासून तुमच्या चमच्यांचे फोन येत आहेत?🤣#गद्दार#UddhavThackeray ❤🚩🏹💪
— Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) July 17, 2022
काय म्हणाल्या अयोध्या पोळ… “जे उद्धव ठाकरेंना सोडून गेलेत ते गद्दारच आहेत. मी त्यांना गद्दारच म्हणते. एकदा नव्हे तर लाख वेळा मी त्यांना गद्दार म्हणते. शिवसैनिक तोच आहे जो ठाकरे आणि ‘मातोश्री’सोबत आहे. ज्या ज्या लोकांनी ‘मातोश्री’ला धोका दिला ते माझ्यासाठी गद्दारच आहे. संतोष बांगर यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मला मारावं. त्यांच्या बगलबच्च्यांना मला फोन करुन धमकी द्यायला लावू नये. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी स्वत: मला फोन करावा”.