मुंबई, 17 मार्च : मुंबई स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्यातले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप (BJP) नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला (MVA Goverment) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनीही या प्रकरणात उडी घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून राज्यातील कोरोना परिस्थिती आणि सचिन वाझे अटक प्रकरणावर भाष्य केले आहे.
एकीकडे नागपूरसारख्या शहरामध्य कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाहीये. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे.
जहां एक तरफ #Nagpur जैसे शहरो में #Corona मरीज़ों को भरती करने की भी अस्पतालों मे जगह नही है,वहाँ दूसरी तरफ #Maharashtra सरकार #covid centres में भ्रष्टाचार कर रही है और उद्योगपातियों को डराके उनसे वसूली करने की योजनाए अपने ही कुछ पिट्ठुओं के साथ मिलकर बना रही है #SachinWaze 👎
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 17, 2021
तसंच, कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करून उद्योगपतींना धमक्या देऊन त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून त्यासाठी आपल्या काही खास पंटराकडून योजना करत आहे, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी सचिन वाझे यांची तुलना पंटराशी केली आहे.
Mansukh hiren death : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल अखेर समोर
याआधीही अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. सुशांत सिंह राजपूत आणि कंगना रनौत प्रकरणावरून अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावरही संशय व्यक्त केला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच वाद पेटला होता.
मुलाने कानाखाली लगावताच धाडकन कोसळली माऊली, जागीच मृत्यू; CCTV VIDEO व्हायरल
शिवसेनेच्या नेत्यांनी अमृता यांनी मुंबईत सुरक्षित राहू वाटत नसेल तर राज्य सोडून जावे, असा सल्लाच दिला होता. त्यानंतर आरे प्रकल्पावरूनही अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amruta fadanvis, Covid19, Devendra Fadnavis