मुंबई, 17 मार्च : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Death Case) अखेर शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या (NIA) हाती हा अहवाल लागला असून हिरेन यांचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाला असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
टीव्ही 9 मराठी वृत्तावाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या तपासाला आता वेग आला आहे. हिरेन यांचा शवविच्छेदनाचा अहवाल एनआयएच्या टीमकडे आला आहे. या अहवालामध्ये हिरेन यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे. त्यांच्या फुफ्फुसामध्ये खाडीतील पाणी आढळले आहे, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आहे. पण, त्यांचा मृत्यू कसा झाले हे मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही.
‘नको तो अभिनय…’; या घटनेमुळं बिग बींची मुलगी राहिली बॉलिवूडपासून दूर
याधीही शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक खुलासा झाला होता. मनसुख यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीरच्या लाल रंगाच्या खुणा आहेत. तसंच चेहऱ्याच्या डाव्या नागपुडीजवळ दीड सेटींमीटर बाय 1 सेंटीमीटरची लाल खूण आढळली. उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खुण असल्याचंही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. हिरेन यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल सवाल उपस्थितीही केला होता.
सचिन वाझेंनी दिली इनोव्हा कारबद्दल कबुली
दरम्यान, मुंबईतल्या दक्षिण मुंबई येथील मायकल रोडवर (Mumbai Carmichael Road) स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडलेल्या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहे. एनआयएच्या (NIA) टीमने एक इनोव्हा गाडी सुद्धा जप्त केली आहे. ती इनोव्हा कार (Innova car) आपणच चालवत होतो, अशी कबुली सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी दिली आहे.
धोनीचा 'मलिंगा लुक' फॅन्सना रुचला नाही, पाहा काय आहे या PHOTO मागचं गौडबंगाल
25 फेब्रुवारी रोजी कार मायकल रोडवर जिलेटीन स्फोटकांनी कार सापडली होती. त्यानंतर घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा कार आढळून आली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझेच चालवत होते, अशी माहिती NIA च्या सूत्रांनी दिली. तसंच, हिरवी स्कॉर्पिओ आणि पांढरी गाडी चालवणारे दुसरे तिसरे कोणी नसून CIU चे पोलीस होते. अखेर या प्रकरणी एनआयएच्या टीमने चौकशी केली असता सचिन वाझे यांनी आपणच ती गाडी चालवत होतो, अशी कबुली दिली आहे.
स्कॉर्पिओ गाडी उभी करून पांढऱ्या गाडीतून सचिन वाझे आणि आणखी दोन CIU चे अधिकारी बसून मुलूंड टोल नाक्यावरुन ठाण्याला गेले होते हिरवी आणि पांढऱ्या रंगाची इनोव्हा आणि स्कॉर्पिओ गाडी ठाणे येथेच पार्क केली होती, अशीही माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hiren mansukh, Mumbai