नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : संयुक्त राष्ट्राच्या (United Nations) नुकत्याच पार पडलेल्या परिवहन परिषदेमध्ये भारताने चीनच्या 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह' (BRI) आणि त्यांचा प्रकल्प चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरला (china-pakistan economic corridor ) तीव्र विरोध केला. मात्र तेथे जेव्हा भारतीय परराष्ट्र अधिकारी (Indian Diplomat) या वादग्रस्त प्रकल्पांवर भारताकडून आक्षेपांची रूपरेषा मांडत होते, तेव्हा त्यांचा माइक अचानक बंद झाला आणि एकच गोंधळ उडाला.
चीनने (China) आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्राच्या 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यानच्या बैठकीत माईकमध्ये अचानक बिघाड झाल्यानंतर माईकमधील बिघाड दुरुस्त होण्यास काही मिनिटे लागली. पुढील वक्त्याचा व्हिडिओ स्क्रीनवर सुरू झाला तोपर्यंत बिघाड दुरुस्त झाला नव्हता. मात्र चीनचे माजी उप-परराष्ट्र मंत्री असलेल्या संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस लियू झेनमिन यांनी ते थांबवले. यानंतर, झेनमिनने भारतीय परराष्ट्र अधिकारी प्रियांका सोहनी (Priyanka Sohani) यांना आपले भाषण सुरु ठेवण्याचा आग्रह केला.
परदेशी प्रवाशांना भारतात RT-PCR टेस्ट बंधनकारक, एक लस घेतलेल्यांना 7 दिवस विलगीकरण, वाचा सविस्तर
कॉन्फरन्स रूममध्ये साउंड सिस्टीम दुरुस्त झाल्यानंतर, झेनमिन यांनी म्हटलं की, झालेल्या प्रकाराबद्द आम्ही दिलगीरी व्यक्त करतो आहोत. आम्हाला काही तांत्रिक अडचणी येत होत्या आणि त्याच दरम्यान पुढील वक्त्यांचा व्हिडीओ सुरू झाला. यासाठी मी दिलगीरी व्यक्त करतो. आणि त्यानंतर त्यांनी प्रियांका सोहनी यांना आपले भाषण पुन्हा सुरू करण्यास सांगितले.
PM मोदींची तेल कंपन्यांच्या प्रमुखांसोबत बैठक, वाढत्या दरांवर तोडगा निघण्याची अपेक्षा
यानंतर भारताकडून बोलताना सोहनी म्हणाल्या की, 'आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाची आकांक्षा मांडत आहोत. आमचा विश्वास आहे की यामुळे सर्वांना न्याय्य आणि संतुलित मार्गाने व्यापक आर्थिक लाभ मिळतील. या परिषदेत BRI च्या सहभागाचा उल्लेख केला गेला. येथे मी सांगू इच्छितो की चीनच्या BRI मुळे आम्ही असमानतेने प्रभावित झालो आहोत. कथित चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा समावेश भारताच्या सार्वभौमत्वामध्ये हस्तक्षेप करतो. सोहनी यांनी पुढे म्हटलं की, कोणताही देश सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेवरील त्याच्या मूळ चिंतांकडे दुर्लक्ष करणाऱ्या उपक्रमाचे समर्थन करू शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.