जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Amazonचा सगळ्यात मोठा Diwali Sale उद्यापासून, Smart Phone वर जबरदस्त ऑफर

Amazonचा सगळ्यात मोठा Diwali Sale उद्यापासून, Smart Phone वर जबरदस्त ऑफर

जगातील सहाव्या नंबरचा सर्वात श्रीमंत देश म्हणजे नॉर्वे. या देशात प्रत्येक व्यक्ती महिन्याला किमान 11 लाख 45 हजार 812 रुपये कमवतो.

जगातील सहाव्या नंबरचा सर्वात श्रीमंत देश म्हणजे नॉर्वे. या देशात प्रत्येक व्यक्ती महिन्याला किमान 11 लाख 45 हजार 812 रुपये कमवतो.

या सेलची सुरुवात 21 ऑक्टोबरला सुरू होणार असून 25 ऑक्टोबरच्या रात्री 11.59 पर्यंत चालणार आहे. या सेलच्या माध्यमातून Apple, Vivo, Samsung, One Plus यासारख्या बड्या ब्रॅण्डचे फोन उपलब्ध असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 21 ऑक्टोंबर : दिवाळीला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. दिवाळी म्हणजे खरेदी आलीच. पण दिवसेंदिवस खरेदीचं स्वरुप मात्र बदलत चाललंय. आता Online खरेदीकडे लोकांचा कल असून बड्या कंपन्याही आता सेल लावून लोकांना घसघशीत सुटही देतात. Amazon आपला दिवाळी बंपर सेल उद्यापासून म्हणजे (21 ऑक्टोबर) सोमवारपासून (Amazon Great Indian festival diwali special sale) बंपर सेल सुरू करतेय. यात स्मार्टफोन, लॅपटॉप, कॅमेरा, मोठे गॅझेट्स, किचन प्रॉडक्ट्स, टी.व्ही. फ्रिज इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. या सेलची सुरुवात 21 ऑक्टोबरला सुरू होणार असून 25 ऑक्टोबरच्या रात्री 11.59 पर्यंत चालणार आहे. या सेलच्या माध्यमातून Apple, Vivo, Samsung, One Plus यासारख्या बड्या ब्रॅण्डचे फोन उपलब्ध असणार आहे.

असे आहेत राज्यातले मतदार, पावणे 2 कोटी युवा मतदार ठरवणार नवीन सरकार

तर अनेक ब्रॅण्डसवर घसघशीत सुटही देण्यात आलीय. मोठ्या गॅझेट्स आणि टी.व्ही.वर नो कॉस्ट EMI एक्सचेंज ऑफर आणि डिलेव्हरीवर 60 टक्के सुटही देण्यात येणार आहे. ग्राहकांना डेबिट आणि क्रेडिट कार्डस् वरही अनेक ऑफर्स आहेत. तर Amazon Pay आणि ICICI क्रेडीट कार्डवर काही पॉईंट्स मिळणार आहेत. या सेल मध्ये एलजी (43) 4k स्मार्ट टीव्ही, हर्लपूल डबल डोअर रेफ्रिजेटर, सॅमसंग पूर्ण ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीन आणि इतर अनेक वस्तूंवर उत्तम ऑफर्स असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

डॉ.अमोल कोल्हेंनी ‘होमपीच’वर सांगितला ‘एसटी बस ते हेलिकॅप्टर’पर्यंतचा प्रवास

देशात आर्थिक विकासाची गती मंदावलेली असल्याने वाहन निर्मितीसह अनेक उद्योगांना मोठा फटका बसलाय. अनेक उद्योगांची उलाढलही घसरलीय. असं असताना ई-कॉमर्स (E commerce Companies) कंपन्यांनी मात्र सणांच्या दिवसांमध्ये बक्कळ कमाई केल्याचं एका पाहणी अहवालात आढळून आलंय. Amazon आणि Flipkartसह काही दिग्गज कंपन्यांनी दसरा आणि नवरात्रीच्या सहा दिवसांमध्ये तब्बल 300 कोटी डॉलर्स म्हणजेच 21 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचं आढळून आलंय. रेडसीर या सल्लागार कंपनीने(Consulting firm RedSeer)  केलेल्या एका अभ्यासात ही माहिती बाहेर आलीय. रेडसीरच्या अहवालानुसार मागच्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 30 टक्के जास्त आहे. जागतिक मंदीसदृश्य स्थिती (Global Slowdown) असताना ही ई कॉमर्स कंपन्यांची ही कामगिरी दिलासा देणारी ठरणार आहे.

आमिर, शाहरुख, कंगना, सोनम अशा कलाकारांना मोदी भेटले आणि केली ही विनंती

काही अहवालांमध्ये यावर्षी  370-380 कोटी डॉलर्सच्या विक्रीचा अंदाच व्यक्त करण्यात आला होता. आर्थिक सुस्ती असताना सणांमुळे लोकांनी वस्तुंची जोरदार खरेदी केली त्यामुळे चांगली आर्थिक उलाढाल झालीय. या हंगामात सर्वात जास्त विक्री Flipkart ने केलीय. मार्केटमध्ये Flipkartचा हिस्सा तब्बल 60 टक्के आहे. तर Amazonचा हिस्सा त्याच्या अर्धा म्हणजे 30 टक्के आहे. सणांच्या दिवसांमुळे लोक Online Shopingला प्राधान्य देत असून दुकानाच्या तुलनेत घसघशीत सुट मिळत असल्याने लोकांचा कल Online Shopingकडे वाढतोय. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी Flipkartच्या विक्रीत 58 टक्क्यांची वाढ नोंदली गेलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात