आमिर, शाहरुख, कंगना, सोनम अशा कलाकारांना मोदी भेटले आणि केली ही विनंती

आमिर, शाहरुख, कंगना, सोनम अशा कलाकारांना मोदी भेटले आणि केली ही विनंती

पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात आमिर खान, शाहरुख खान, कंगना रनौट, सोनम कपूर, एकता कपूर, राजकुमार हिरानी, आनंद एल राय यांच्याबरोबरच छन्नूलाल मिश्रा यांच्यासारखे कलाकार उपस्थित होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर :  महात्मा गांधी यांची 150 वी जयंती नुकतीच झाली. त्यानिमित्त पंतप्रधानांच्या निवासस्थानी 7 लोककल्याण मार्ग इथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी चित्रपटक्षेत्राशी संबंधित अनेक कलाकार उपस्थित होते. पंतप्रधानांनी चित्रपट कलावंतांव्यतिरिक्त अन्य कलाकारांशीही बातचीत केली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात आमिर खान, शाहरुख खान, कंगना रनौट, सोनम कपूर, एकता कपूर, राजकुमार हिरानी, आनंद एल राय यांच्याबरोबरच छन्नूलाल मिश्रा यांच्यासारखे कलाकार उपस्थित होते.

पंतप्रधानांनी या सर्व कलाकारांना भेटून गांधीजींचे विचार आणि तत्त्व पुन्हा एकदा जनमानसात लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. गांधीजींच्या विचारांमध्ये रचनात्मक शक्ती खूप आहे.

वाचा - ...म्हणून सनी देओलनं शाहरुख खानसोबत काम करणं केलं बंद

त्यांचे आदर्श लोकप्रिय करण्यासाठी चित्रपट आणि टीव्ही कलाकार काम करू शकतात. त्यांनी तसं काम केलंही आहे. गांधीजींचे आदर्श आणि विचार जगभर लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने त्यांनी आणखी काम करावं, अशी विनंती मोदींनी या कलाकारांना केली.

आमिर खानने या वेळी संवाद साधताना क्रिएटिव्ह व्यक्ती मिळून आम्ही हे काम नक्की करू, अशं आश्वासन पंतप्रधानांना केलं.

वाचा - पहिल्यांदाच एक्सपर्ट सुद्धा झाले फेल, KBCच्या प्रश्नाचं उत्तर Google कडेही नाही

शाहरुख खाननेही पंतप्रधानांनी या चांगल्या कामात आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल आभार मानले. "भारत आणि जगाला गांधींचा पुन्हा एकदा परिचय करून दिला पाहिजे", असं शाहरुखनी सांगितलं.

-------------------------------------------

VIDEO : परळीपासून ते वरळी 'या' आहे राज्यातील बिग फाईट्स, कोण मारणार बाजी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 09:00 PM IST

ताज्या बातम्या