जागावाटपावर पेच असतानाच उद्धव ठाकरेंनी केलं 'युती'वर मोठं विधान

जागावाटपावर पेच असतानाच उद्धव ठाकरेंनी केलं 'युती'वर मोठं विधान

आधी खूप कामं केली आहेत आताही करतोय आता तर फक्त शिवसेना नाही तर भाजपा देखील सोबत आहे कारण 2014च्या निवडणूकीत आमची युती नव्हती, मात्र आम्ही गेली 5 वर्षे सोबत आहोत.

  • Share this:

अजित मांढरे, ठाणे 11 सप्टेंबर : 'युती'च्या जागावाटपावर सध्या पेच निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. भाजपला थोड्या जास्त जागा पाहिजे आहेत तर शिवसेना 50:50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्यावर अडून असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे तोडगा कसा निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अशी परिस्थिती असताना शिवसेनेचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'युती'वर मोठं वक्तव्य केलंय. ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलंय. उद्धव ठाकरे म्हणाले, 2014मध्ये युती नव्हती. आता भाजपसोबत 'युती' आहे आणि यापुढेही राहणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे जागावाटपात अडचणी असल्यातरी अडलेली चर्चेची गाडी फार काही थांबणार नाही असं बोललं जातंय. उद्धव ठाकरे म्हणाले, आधी खूप कामं केली आहेत आताही करतोय आता तर फक्त शिवसेना नाही तर भाजपा देखील सोबत आहे कारण 2014च्या निवडणूकीत आमची युती नव्हती आम्ही गेली 5 वर्षे सोबत आहोत आताही आहोत आणि पुढे असणार आहोत असं भाष्य करुन युतीवर त्यांनी पुन्हा एकदा मोहोर उमटवली.

पंकजा मुंडेंकडे आठशे कोटींचा दारुचा कारखाना, धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

त्यामुळे युती होणार की नाही यांवर पुन्हा एकदा पडदा पडला असून फक्त कोणता पक्ष किती जागा लढणार यांवर घोडं अडल्याचं देखील स्पष्ट झालंय. ठाण्यात विविध कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते आले होते.

ताकद वाढल्याने भाजपने यावेळी जास्त जागांची मागणी केलीय. तर जागावाटप समसमान व्हावं असं शिवसेनेला वाटतं. पण या थोड्या अडचणी असल्या तरी आठवडाभरात जागावाटपाची घोषणा होईल अशी आशा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही केली होती.

फक्त राष्ट्रवादी नाही शिवसेनेलाही धक्का देणार नाईक, 70 जणांचा भाजप प्रवेश होणार

शिवसेना 50 टक्के फॉर्म्युल्यावर ठाम

भाजप आणि शिवसेनेदरम्यान जागावाटपासाठी बोलणी सुरू आहे. ही बोलणी अंतिम टप्प्यात आली असं बोललं जात असतानाच शिवसेना समसमान जागावाटपावर ठाम असल्याची माहिती पुढे आलीय. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना पुन्हा एकदा 50:50 च्या जागा वाटपासाठी आग्रही आहे. दोन्ही पक्षांनी 288 पैकी 144-144 जागा वाटून घेण्याची शिवसेनेची भूमिका आहे. तर भाजपची जास्त जागांची मागणी आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधल्या ज्येष्ठ लोकांना यावर तोडगा काढवा लागणार आहे. घटक पक्षांना देण्यात येणाऱ्या 18 जागांपैकी 9-9 जागा दोन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून द्याव्यात अशी शिवसेनेची मागणी आहे तर 174 भाजप आणि 114 शिवसेना = 288 जागा असा भाजपचा प्रस्ताव आणि या एकूण जागावाटप करुन प्रत्येकी ९ जागा घटक पक्षांना देण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे त्यामुळे पुन्हा एकदा गुंता निर्माण झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 04:53 PM IST

ताज्या बातम्या