• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • फक्त राष्ट्रवादी नाही शिवसेनेलाही गणेश नाईक देणार धक्का, 70 जणांचा भाजप प्रवेश होणार

फक्त राष्ट्रवादी नाही शिवसेनेलाही गणेश नाईक देणार धक्का, 70 जणांचा भाजप प्रवेश होणार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर तीनही प्रमुख राजकीय पक्षांना धक्का देत गणेश नाईकांनी आपलं वजन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

 • Share this:
  नवी मुंबई, 11 सप्टेंबर : नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नाईक यांच्या प्रवेशावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह 70 जण भाजपमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचेही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यातील हे माजी नगरसेवक असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर तीनही प्रमुख राजकीय पक्षांना धक्का देत गणेश नाईकांनी आपलं वजन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा दिवस अखेर आज आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गणेश नाईक आज भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर नाईक समर्थकांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे 55 नगरसेवक सकाळी कोकण आयुक्तांकडे प्रतिज्ञापत्र सादर करून स्वतंत्र गटाची नोंदणी करणार आहेत. गणेश नाईक राष्ट्रवादीला खिंडार पाडणार गणेश नाईक नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या तयारीत आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांचे पूत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता जिल्ह्यातील नेते, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्यांसह गणेश नाईक लवकरच प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती. मात्र अखेर आज ते भाजपमध्ये प्रवेश करतील, यावर शिक्कामोर्तब झालं आहे. वाहतूक पोलिसाची मुजोरी! सर्वसामान्यावर दमदाटी करत मारली लाथ VIDEO VIRAL
  Published by:Akshay Shitole
  First published: