जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Alert! मुंबईतील कोरोना व्हायरसची 'ही' बातमी आहे अफवा

Alert! मुंबईतील कोरोना व्हायरसची 'ही' बातमी आहे अफवा

Alert! मुंबईतील कोरोना व्हायरसची 'ही' बातमी आहे अफवा

काल दिवसभरात मुंबईत कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळल्याची बातमी पसरली होती

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 मार्च : देशभरात 28 जणांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याची माहिती काल आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी (Health Minister) पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली होती. देशात 300 जण हे संशयित रुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) कोरोनाचा रुग्ण आढळल्याचे वृत्त पसरले होते. मीरा रोडच्या भक्ती वेदांत या  रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण आढळल्याची माहिती पसरली होती. काल दिवसभर समाज माध्यमांवरुन ही बातमी पसरली होती. मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकड़े याबाबत विचारणा केली असता ती अफवा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळला नसून ही अफवा असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित - भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 वर महापालिकेनं काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबईत तीन कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण दाखल केल्याची माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे या रोगाचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याचा दावा पालिकेने केला आहे. पालिकेच्या म्हणण्याप्रमाणे सध्या महापालिका रुग्णालयात म्हणजेच कस्तुरबा गांधी रुग्णालयात 28 बेड हे विलगीकरणाचे म्हणजेच आईसोलेशन तयार ठेवण्यात आले आहे. सोबतच पालिकेनं स्वतःची पीएससी लॅब तयार केली आहे. ज्यात या संशयित रुग्णांचे नमुने तपासले जाऊ शकतात. ते आता पुण्याला पाठवण्याची गरज नाही. संबंधित - कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याचा असू शकतो सोपा उपाय; चीन करतोय प्रयोग एकाच दिवशी पालिका 90 जणांचे नमुने तपासू शकते. प्रत्येक नमुना तपासायला तीन तासांचा कालावधी लागतो. तर त्याचा अहवाल यायला दोन तासाचा कालावधी लागतो. असे एकूण पाच तासात हे नमुने तपासले जाऊ शकतात. पालिकेने कस्तुरबा गांधी रुग्णालय याव्यतिरिक्त इतर चार महापालिका रुग्णालयालाही सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीमधील एका कोरोनाबाधित रुग्णामुळे आग्र्यातील (Agra) 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर जयपूर (Jaipur) येथे पर्यटनासाठी आलेल्या इटालियन (Italian) ग्रुपमधील 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या भारतीय ड्रायव्हरलाही या आजाराची लागण झाली आहे. हैद्राबादमध्ये (Hyderabad) एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या केरळात (Kerala) 3 बाधित रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. संबंधित - मोबाईलमध्येही घुसला कोरोना; ‘या’ मेसेजवर क्लिक कराल तर व्हाल व्हायरसचे शिकार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात