मराठी बातम्या /बातम्या /विदेश /कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याचा असू शकतो सोपा उपाय; चीन करतोय प्रयोग

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याचा असू शकतो सोपा उपाय; चीन करतोय प्रयोग

भारतीय जेवणात रोज समावेश असणाऱ्या एका पदार्थातल्या घटकद्रव्यांमुळे कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो. चीनमध्ये या व्हिटॅमिनच्या वापराबद्दल प्रयोग सुरू आहेत.

भारतीय जेवणात रोज समावेश असणाऱ्या एका पदार्थातल्या घटकद्रव्यांमुळे कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो. चीनमध्ये या व्हिटॅमिनच्या वापराबद्दल प्रयोग सुरू आहेत.

भारतीय जेवणात रोज समावेश असणाऱ्या एका पदार्थातल्या घटकद्रव्यांमुळे कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो. चीनमध्ये या व्हिटॅमिनच्या वापराबद्दल प्रयोग सुरू आहेत.

बीजिंग, 3 मार्च : चीन (china) मधले डॉक्टर सध्या अतिशय लक्षपूर्वक एक प्रयोग करत आहेत. हा प्रयोग आहे कोरोना व्हायरस (Coronavirus) वर नियंत्रण मिळवण्याचा. दररोजच्या भारतीय जेवणात ज्या पदार्थाचा नेहमी वापर होतो, त्यामध्ये असणाऱ्या घटकद्रव्याने कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं का यावर प्रयोग सुरू आहेत. कोरानावर व्हिटॅमिन सी (Vitamin C) च्या मदतीने नियंत्रण मिळवता येतं का, याचं उत्तर आता शास्त्रज्ञ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

लिंबू, मिरची, भारतीय फळं यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. भारतात आणि जगभरात थंडी किंवा त्यामुळे होणारी सर्दी, कफ यावर उपाय म्हणून व्हिटॅमिन सी औषधांमध्ये वापरलं जातं. मानवी क्षमता किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी चा वापर केला जातो. साधारणपणे डॉक्टर व्हिटॅमिन सी चा समावेश असणारी औषधं रुग्णाला देतात. पण कोरोना व्हायरसचा त्रास कमी होण्यासाठी याच व्हिटॅमिन सी चा उपयोग होऊ शकतो का? चीनमधले डॉक्टर सध्या याच शक्यतेवर संशोधन करत आहेत.

डेली मेल'च्या वृत्तानुसार व्हिटॅमिन सी चा यामध्ये कसा उपयोग करता येईल. कारण जखम आणखी वाढू नये किंवा विस्मरण या सारख्या रोगांमध्ये सुद्धा याच व्हिटॅमिन सी चा वापर केला जातो. आणि असा वापर यशस्वी सुद्धा होतो.

1970 मध्ये व्हिटॅमिन सी पुढे आली महत्वाची माहिती

एका आकडेवारीनुसार व्हिटॅमिन सी चा आजारपणात सप्लिमेंटरी म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो. व्हिटॅमिन सी ची उलाढाल सध्या 880 कोटी रुपयांची आहे. हीच उलाढाल 2024 पर्यंत 1 लाख कोटींच्या घरात पोहोचण्याचा अंदाज आहे. 1970 मध्ये जगात पहिल्यांदा सर्दी, कफ यासारख्या आजारपणाच्या नियंत्रणासाठी व्हिटॅमिन सी चा उपयोग करण्यात आला होता. याबद्दल वैद्यकीय क्षेत्रात दोन वेगवेगळी मतं असली तरीही, तरीही शरीरामध्ये होणाऱ्या सर्दी किंवा तत्सम आजारांसाठी व्हिटॅमिन सी चा वापर फायद्याचा असतो.

काय आहे व्हिटॅमिन सी मागचं रहस्य?

व्हिटॅमिन सी मुले शरीराला होणारा फायदा हा खूप महत्वाचा आहे. कारण सर्दी किंवा कफ, खोकला अशा व्हायरल आजारांमध्ये शरीराला लागणारी सगळ्यात जास्त रोग प्रतिकारक शक्ती ही व्हिटॅमिन सी मधूनच मिळते. अर्थात व्हिटॅमिन सी मुळे शरीरातल्या रक्तामधील पांढऱ्या पेंशींचं प्रमाण हे वाढायला मदत करते. यामुळे कोणत्याही प्रकारच्या व्हायरल आजारांचा सामना करण्यासाठी शरीरात शक्ती निर्माण होते. याच व्हिटॅमिन सी बद्दल 2017 मध्ये एक संशोधन पुढे आलं आहे. यानुसार दररोज तर एक हजार मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी चं सेवन केलं तर सर्दी किंवा अन्य प्रकारच्या व्हायरल आजारांचं प्रमाण झपाट्याने कमी होऊ शकतं.

अन्य बातम्या

'कोरोना'शी लढ्याचं 'केरळ मॉडेल', भारतातील पहिले 3 रुग्ण असे झाले व्हायरसमुक्त

महाराष्ट्रात कोरोनाचा संशयित रुग्ण; तुम्हालाही होऊ शकतो व्हायरस, असा करा बचाव

First published:
top videos

    Tags: China, Coronavirus