मुंबई, 03 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. आता ‘फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्यात येणार’, अशी घोषणा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार दणका दिला आहे. अर्थसंकल्पयीय अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवसाची सुरूवात भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या खडाजंगीने सुरुवात झाली. ‘फडणवीस सरकारच्या काळातील 33 कोटी वृक्षारोपण करण्यात आले होते. राज्यात वर्ष 2016 ते 2017 आणि 2019-20 या कालावधीत वन विभागाने वृक्ष लागवड योजनेत 28.27 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. ऑक्टोबर 2020 अखेरीस त्यातील 75.63% रोपे म्हणजे २१ कोटी जिवंत आहेत,त्याची देखभाल करण्यात येत आहे. 2017 ते 2019 कालावधीत वन विभागाने शासकीय यंत्रणा ,शैक्षणिक संस्था,उद्योगसमूह ,खासगी व्यक्ती यांच्या माध्यमातून 50 कोटी वृक्ष लावण्याची मोहीम राबाबण्यात आली होती. ही मोहिम राबवण्यासाठी २०१६-१७ते २०१९-२० दरम्यान २४२९.७८ कोटी निधी मिळाला होता तो पूर्व वापरण्यात आला. २५ टक्के रोपं जिवंत का राहिली नाही याची चौकशी केली जाईल, अशी मागणी मंत्री दत्ताराय भारणे यांनी केली. त्यानंतर या प्रकरणाची विधिमंडळाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी ‘या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तर दिले आहे. मग मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर मंत्र्यांचा विश्वास नाहीये का? आम्हाला चौकशीची अडचण नाहीये पण तुमचा तुमच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाहीये का?’ असा सवाल सत्ताधाऱ्यांना विचारला. ‘सभागृहाचं उत्तरावर समाधानी नसेल तर विधीमंडळाची चौकशी समिती नेमली जात असते. हा तर तुमचा ड्रीम प्रोजेक्ट होता, फडणवीस तुमचा होता की मुनगंटीवारांचा? मग समिती नेमण्यात येणार याची मिरची का लागली?, अशा जोरदार पलटवार नाना पटोले यांनी केला. ‘वृक्ष लागवड हे ईश्वरीय कार्य आहे. वडेट्टीवार यांनी याबद्दल चौकशी करायला सांगितली. मग त्या चौकशीचे काय झालं ? यात काही चुक असेल तर चूक सांगितलं पाहिजे. याबद्दलची समिती किती दिवसात स्थापन होणार ? आणि त्याला अहवाल किती दिवसात येणार याची सुस्पष्ट कल्पना दिली पाहिजे’, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यानंतर अजित पवार यांनी ‘फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी होणार आहे. पुढील सहा महिन्यात चौकशी अहवाल तयार होणार असून तो सादर केला जाईल’, अशी घोषणा केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.