मुंबई, 04 मे : मशिदीवरील (mosques ) अनधिकृत भोंगे काढण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा दिला होता. आज ठिकठिकाणी मनसेसैनिकांनी पोलिसांची नजर चुकवून मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा प्रयत्न केला. पण, मुंबईतील बऱ्याच मशिदीवर आज भोंगे न लावताच अजान (Ajaan ) पठण करून शांततेतून उत्तर देण्यात आलं. मनसेनं आज 4 तारखेची डेडलाईन दिल्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण होते. रात्रीपासूनच ठिकठिकणी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर आज सकाळपासून धरपकड सुरू होती. पण, मुंबईत आज अनेक मशिदीवर मात्र शांततेचा निर्णय घेण्यात आला. ( OBC Reservation: अडीच वर्ष काय केलं? पंकजा मुंडे राज्य सरकारवर बरसल्या ) मुंबईतील अनेक मशिदींमध्ये भोंगे न लावताच अजान पठण करण्यात आली. इस्लाम धर्मियांनी यावेळी शांततेची भूमिका घेतली आहे. उगाच वाद ओढवून घेण्यापेक्षा भोंग्यांवर आज तरी अजान नको ही भूमिका अनेक मशिदींनी घेतली आहे. त्यामुळे मनसेनं पुकारलेल्या वादावर पाणी फेरले गेले आहे. तसंच, मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरात मुंबईत १,१४४ मशिदींनी अर्ज केले आहे. या मशिदींनी भोंग्या संदर्भात परवानगीसाठी अर्ज केले आहे. यापैकी ८०३ मशिदींना परवानगी देण्यात आली आहे. ( ‘ही’ टीव्ही अभिनेत्री बनली ‘खतरों के खिलाडी 12’ची पहिली स्पर्धक, जाणून घ्या ) सर्व मशिदींनी सुप्रीम कोर्टाच्या नियंमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, आज राज्यात 4 मे रोजी काही मशिदींवरील भोंगे वापरण्यात आले नाहीत, तर भोंग्यांचा आवाज कमी झाल्याचे पाहायला मिळाल्याची माहिती, राज्याच्या पोलीस सूत्रांनी दिली आहे. परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, शिर्डी, श्रीरामपूर आणि जालना जिल्ह्यातील काही ठिकाणी मशिदींवर कोणत्याही प्रकारचे लाऊडस्पीकर वापरले गेले नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.