Home /News /entertainment /

'ही' टीव्ही अभिनेत्री बनली 'खतरों के खिलाडी 12'ची पहिली स्पर्धक,समोर आल्या डिटेल्स

'ही' टीव्ही अभिनेत्री बनली 'खतरों के खिलाडी 12'ची पहिली स्पर्धक,समोर आल्या डिटेल्स

'खतरों के खिलाडी-12' या शोची सध्या जोरदार चर्चा आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही रोहित हा शो होस्ट करणार आहे.

    मुंबई, 4 मे-   छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री   (Tv Actress)  आणि 'बिग बॉस 14' विजेती  (Bigg Boss 14 Winner)  रुबिना दिलैक   (Rubina Dilaik)  सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा रोहित शेट्टी होस्टेड 'खतरों के खिलाडी-12'  (Katron Ke Khiladi 12)  ची पहिली स्पर्धक रुबिना दिलैक बनल्याचं म्हटलं जात आहे. दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर, अखेरीस टीव्ही अभिनेत्री रुबीनाने स्वतःखुलासा करत आयाबाबत सांगितलं आहे. रुबिना दिलैकच्या म्हणण्यानुसार, ती दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या स्टंट आधारित रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहे. यासाठी ती खूप उत्सुकही आहे. या आगामी शोची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. 'खतरों के खिलाडी-12' या शोची सध्या जोरदार चर्चा आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही रोहित हा शो होस्ट करणार असून यावेळी शोचे लोकेशन दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊन आहे. रिपोर्टनुसार, खतरों के खिलाडी 12 चे शूटिंग मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल. त्याआधी शोचे सर्व स्पर्धक दक्षिण आफ्रिकेला देखील रवाना होणार आहेत. Telechakkar.com च्या वृत्तानुसार, एका मुलाखतीदरम्यान रुबीना म्हणाली, “मी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. या गोष्टींनी मला मजबूत बनवले आहे आणि खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होण्यासाठी मी खूप प्रेरित आणि उत्साहित आहे.” असं म्हणत अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला आहे. 'बिग बॉस 14' ची विजेती झाल्यापासून रुबिना सतत चर्चेत असते. या आगामी शोबाबत बोलताना ती म्हणाली की, 'तिला विश्वास आहे की रोहित शेट्टीच्या मार्गदर्शनाने ती या शोची विजेती बनेल. ती म्हणते- “रोहित शेट्टी सरांच्या मार्गदर्शनाने मी माझ्यासाठी जे काही ठरवले आहे त्याहून अधिक साध्य करू शकेन. यासोबतच माझ्या या नवीन प्रयत्नात सर्व चाहत्यांनी मला साथ द्यावी अशी माझी इच्छा आहे'. कामाबाबत सांगायचं तर रुबिना 'अर्ध' चित्रपटातून आपला बॉलिवूड डेब्यू करत आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bigg boss, Entertainment, Rubina dilaik, Tv shows

    पुढील बातम्या