मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मेट्रो कारशेड प्रतिष्ठेचा विषय नाही, ठाकरे आणि मोदींच्या भेटीनंतर फडणवीसांची तलवार म्यान

मेट्रो कारशेड प्रतिष्ठेचा विषय नाही, ठाकरे आणि मोदींच्या भेटीनंतर फडणवीसांची तलवार म्यान

हाच मुद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackery) यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मांडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना शह देण्याचा प्रयत्न केला.

हाच मुद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackery) यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मांडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना शह देण्याचा प्रयत्न केला.

हाच मुद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackery) यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मांडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना शह देण्याचा प्रयत्न केला.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 08 जून: मुंबईतील कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या (metro car shed Kanjurmarg) मुद्यावरून ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये चांगलाच वाद पेटला होता. हाच मुद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मांडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना शह देण्याचा प्रयत्न केला. आता मोदींच्या कोर्टात मेट्रो कारशेडचा चेंडू पडल्यामुळे 'हा आमच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा नाही' असं म्हणून फडणवीसांनी तलवार म्यान केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि मराठा आरक्षणासह 12 मुद्दे मांडले. या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

"मुळशी तालुक्याची रग दाखवतो, आता आपल्या आई-बापांसाठी रग दाखवा" - प्रविण तरडे

'मेट्रो कारशेड हा आमच्यासाठी काही प्रतिष्ठेचा विषय नाही. पण, आरे कारशेडमध्ये मेट्रोचे काम 25 टक्के पूर्ण झाले आहे. जर काम सुरू केले तर 9 महिन्यात पूर्ण होईल. तेच काम कांजूरमार्गच्या जागेवर केले तर त्याचा खर्च आणखी वाढणार आहे, तसंच वेळ सुद्धा 4 वर्ष लागणार आहे. पण, मेट्रो लवकर व्हावी अशी आमची सुद्धा मागणी आहे', असंही फडणवीस म्हणाले.

तर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे मेट्रो कार शेडसाठी कांजुरमार्ग येथील जागेची उपलब्धता केली असून यावर न्यायालयाबाहेर तोडगा काढावा अशी मागणी केली आहे.  मेट्रो कारशेड डेपो करण्यासाठी राज्य सरकारने कांजूरमार्ग येथे जागा निश्चित केली आहे. जी मेट्रो लाईन ३, मेट्रो लाईन ४, मेट्रो लाईन ४ ऐ, मेट्रो लाईन ६ आणि मेट्रो लाईन १४   या पाच मेट्रो लाईनला जोडण्यासाठी उपयुक्त आहे.  मोठे मेट्रो जंक्शन म्हणून ही जागा विकसित होईल.  मात्र या भुखंडाच्या जागेबाबत खटला सुरू असून यात केंद्र सरकारलाही प्रतिवादी करण्यात आले आहे.

तुमच्या कामाची बातमी;Appअसली आहे की नकली?डाउनलोड करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा

कांजूरमार्ग येथे कारशेड डेपो केल्यास मेट्रो लाईन ३, मेट्रो लाईन ४, मेट्रो लाईन ४ ए, मेट्रो लाईन ६ आणि मेट्रो लाईन १४ ला एकात्मिक कार शेड डेपोचे  फायदे मिळणार आहेत. हा डेपो  मेट्रो लाईन ३ साठीच उपयुक्त नाही तर संपूर्ण मेट्रो जाळ्यासाठी उपयुक्त आहे हे यावरून लक्षात येईल. याप्रकरणी सर्व संबंधितांना तातडीने निर्देश देऊन सर्वमान्य तोडग्यासाठी  सांगावे जेणे करून मेट्रो डेपोचे काम लवकरात लवकर सुरू होऊन तो कार्यान्वित होऊ शकेल, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केली.

First published:

Tags: Uddhav Thackery