मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबात राडा, महिलेचा मृत्यू; वडिलांना पडले टाके

मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबात राडा, महिलेचा मृत्यू; वडिलांना पडले टाके

गल्लीत खेळताना लहान मुलांच्या दोन गटात झालेल्या भांडणानंतर दोन कुटुंबात (One dies in fight between two group of parents) जोरदार हाणामारी झाली.

गल्लीत खेळताना लहान मुलांच्या दोन गटात झालेल्या भांडणानंतर दोन कुटुंबात (One dies in fight between two group of parents) जोरदार हाणामारी झाली.

गल्लीत खेळताना लहान मुलांच्या दोन गटात झालेल्या भांडणानंतर दोन कुटुंबात (One dies in fight between two group of parents) जोरदार हाणामारी झाली.

चंदिगढ, 14 ऑक्टोबर :  गल्लीत खेळताना लहान मुलांच्या दोन गटात झालेल्या भांडणानंतर दोन कुटुंबात (One dies in fight between two group of parents) जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एका महिलेचा मृत्यू झाला (Stitches to parent of a child) असून दुसऱ्या व्यक्तीला 10 टाके पडले आहेत. मुलांच्या दोन गटातील किरकोळ वाद सोडवताना मोठ्यांमध्येच भांडणं जुंपल्यामुळे हा प्रकार घडला. या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अशी झाली भांडणं

हरियाणातील सोनिपतमध्ये दोन गटातील मुलांमध्ये जोरदार भांडणं झाली. मुलांनी त्यांच्या पालकांकडे एकमेकांची तक्रार केली. त्यानंतर एका गटाच्या पालकांनी दुसऱ्या गटातील मुलांना चोप द्यायला सुरुवात केली. हे पाहून दुसऱ्या गटाचा पालकवर्ग समोर आला आणि त्यांनी पहिल्या गटाच्या पालकांना जाब विचारायला सुरुवात केली. त्यानंतर मुलांची भांडणं मागे पडली आणि मोठ्यांमध्येच जोरदार हाणामारी सुरू झाली.

एका महिलेचा झाला मृत्यू

या वादावादीत एका वृद्ध महिलेला हृदयविकाराचा जोरदार झटका आला. या झटक्यात महिलेचा मृत्यू झाला. तर एका मुलाच्या वडिलांना अनेक जखमा झाल्या आहेत. पालकांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत एका पालकाला इतकी मारहाण करण्यात आली की ते अक्षरशः रक्तबंबाळ झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना एकूण 10 टाके पडल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे वाचा- चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या मुलावर हल्ला, धारदार शस्त्राने मुंबईकर तरुणाला केल ठार

प्रत्यक्षदर्शींनी दिली माहिती

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मुलांच्या पालकांचे दोन्ही गट एकमेकांना भिडले. प्रत्येकाने आपापल्या घरातून लाठ्याकाठ्या आणल्या आणि एकमेकांवर प्रहार करायला सुरुवात केली. पाहता पाहता दोन्ही गटांनी एकमेकांना शिविगाळ करत बडवून काढायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून मुलांनी तिथून पळ काढला. पालक मात्र एकमेकांशी भांडत राहिले. एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतरच हे भांडण शमलं.

भांडण सहन न झाल्यामुळेच आपल्या आईला हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा तिच्या मुलाने केला आहे. या प्रकऱणी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले असून पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Haryana, Murder