फ्लोरिडा, 14 ऑक्टोबर : अमेरिकेत एका दोन वर्षांच्या बाळाने आपल्या आईचा जीव (2 year old kills his mother by firing bullet) घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळता खेळता या बाळाच्या हातात बंदूक लागली आणि त्याने ट्रिगर दाबताच (bullet went into mother’s head) आईच्या डोक्यात गोळी घुसली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून बाळाच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
अशी घडली घटना
अमेरिकेतील मध्य फ्लोरिडामध्ये ही घटना घडली. अल्टोमोंटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक महिला तिच्या घरातून काम करत होती. तिचा 2 वर्षांचा मुलगा घरातच खेळत होता. मुलाचे वडील घरात नव्हते. मात्र त्यांची बंदूक घरातच होती आणि बंदूक ठेवलेली बॅग उघडी होती. मुलाची आई झूम मिटिंगवर बिझी असतानाच मुलाने ती बंदूक बॅगेतून काढली आणि त्यासोबत खेळू लागला.
मुलाने चालवली गोळी
खेळता खेळता मुलाने ती बंदूक आईच्या दिशेला वळवली आणि त्याचवेळी ट्रिगल दाबला. त्यामुळे बंदुकीतून गोळी सुटली आणि थेट आईच्या डोक्यात घुसली. यामुळे महिला जागेवरच कोसळली. तिच्यासोबत झूम कॉलवर असणाऱ्या महिलेने पोलिसांना फोन करून याची माहिती दिली आणि आपण गोळीचा आवाज ऐकल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला.
हे वाचा - IND vs PAK महामुकाबल्याआधी पुन्हा 'मौका-मौका', काचा फुटणार का टीव्ही? पाहा VIDE
महिला पडली रक्ताच्या थारोळ्यात
महिलेचा पार्टनर जेव्हा रुमवर पोहोचला, तेव्हा तिथं रक्ताचा सडा पडला होता. पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते आणि बाळाची आई मरण पावली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हाच महिलेचे प्राण गेले होते. पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन बाळाच्या वडिलांना अटक केली आहे.
निष्काळजीपणाचा आरोप
बंदूक उघडी ठेवणे, हत्यार बाळगण्यात निष्काळजीपणा करणे आणि मृत्यूस कारणीभूत ठरणे या गुन्ह्यांखाली पोलिसांनी बाळाच्या वडिलांना अटक केली आहे. अमेरिकेत बंदूक बाळगणे हा सामान्य प्रकार असला तरी त्यामुळे हकनाक अनेकांचे प्राण जात असल्याचं गेल्या काही दिवसांतील घटनांमधून दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.