Home /News /mumbai /

‘दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजणार’ नारायण राणे यांनी दिला इशारा

‘दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजणार’ नारायण राणे यांनी दिला इशारा

'मुख्यमंत्री घराच्याबाहेर निघत नाहीत. या सरकारला काहीही जमत नाही. सरकारचं सध्या फक्त हात धुणे सुरू आहे. भ्रष्टाचार जोरात सुरू आहे.'

    मुंबई 12 नोव्हेंबर: मुख्यमंत्री घराच्याबाहेर निघत नाहीत. या सरकारला काहीही जमत नाही. लवकरच दिवाळीनंतर महाराष्ट्र सरकारचे (Maharashtra government)फटाके वाजतील असा सूचक इशारा भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला आहे. सरकारचं सध्या फक्त हात धुणे सुरू आहे. भ्रष्टाचार जोरात सुरू आहे. योग्य वेळी तोही बाहेर काढू असंही राणे यांनी म्हटलं आहे. त्या फटाक्याचं स्वरुप कसं असेल ते आत्ताच काही सांगत नाही योग्य वेळ आली की सांगणार असा इशाराही राणे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिला. राणे म्हणाले, राज्याची आर्थिक स्थिती रसातळाला गेली आहे. फक्त योजना बंद करा आणि नवे टेंडर काढा हे प्रकार सुरू आहेत. यांचं हे काम फार काळ चालणार नाही आमचं सरकार आलं की यांच्या सर्वच व्यवहारांची चौकशी करू असंही त्यांनी सांगितलं. बिहारमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतरही शिवसेना दुसऱ्यांना सल्ले देत आहे. यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही असंही ते म्हणाले. लोकांनी भाजपला स्वीकारलं असून आमचे कायमचे ‘मॅन ऑफ दी मॅच’ हे नरेंद्र मोदीच आहेत. मोदींच्या करिष्म्यामुळेच भाजपला यश मिळालं आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी मेहनत घेतली त्याचं फळ म्हणजे बिहारमधली निवडणूक आहे. भाजपला ते गिफ्ट नाही तर मेहनतीचं फळ आहे असंही राणे यांनी सांगितलं. हातगाडी..पाणीपुरी-शेवपुरी आणि 'त्या' तिघी, धडपड पाहून राज ठाकरेही भारावले दरम्यान, अमृता फडणवीस यांनीही शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. बिहार विधानसभेतल्या निकालांवरून (Bihar assembly result) त्यांनी शिवसेनेवर सर्वात मोठा हल्लाबोल केलाय. शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा करत शवसेनेने आपल्याच साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले अशी टीका त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या एका मुलाखतीचा आधार घेत त्यांनी हा हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत त्यांनी बिहारमध्ये शिवसेनेने किती वाईट कामगिरी केली ते सांगितलं. शिवसेनेने आधीच मोठ मोठ्या गोष्टी केल्या. आम्ही 50 जागा लढवणार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे प्रचाराला जाणार असं सांगितलं होतं. मात्र त्यांच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट तर जप्त झालंच पण त्यातल्या बहुतांश उमेदवारांना  नोटापेक्षाही कमी मतं मिळाली असा टोलाही फडणवीस यांनी लगावला होता. पंतप्रधानांच्या भाषणानंतर 24 तासांत भाजपच्या अध्यक्षावर हल्ला त्यावरून अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला टार्गेट केलं. काय चाललं तरी काय - शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे! महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बद्दल धन्यवाद असं त्यांनी म्हटलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Narayan rane, Uddhav thackeray

    पुढील बातम्या