मराठी बातम्या /बातम्या /देश /पंतप्रधानांच्या भाषणानंतर 24 तासांत भाजपच्या अध्यक्षावर हल्ला, मोदींनी दिलं होतं थेट आव्हान

पंतप्रधानांच्या भाषणानंतर 24 तासांत भाजपच्या अध्यक्षावर हल्ला, मोदींनी दिलं होतं थेट आव्हान

दिलीप घोष यांचा चाय पे चर्चा नावाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपवून ते येत असताना हा भयंकर हल्ला झाला आहे.

दिलीप घोष यांचा चाय पे चर्चा नावाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपवून ते येत असताना हा भयंकर हल्ला झाला आहे.

दिलीप घोष यांचा चाय पे चर्चा नावाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपवून ते येत असताना हा भयंकर हल्ला झाला आहे.

कोलकाता, 12 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतचं आवाहन करून 24 तास उलटल्यानंतर मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वारमध्ये भाजपच्या ताफ्यावर भयंकर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार अगदी शिगेला पोहोचला आहे आणि अशा परिस्थितीत अनेक हल्ले आणि विचित्र घटना समोर येत आहेत. भाजप विरुद्ध तृणमूल आमने-सामने आणि दमदार तयारीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना आज प्राचारसभेसाठी निघालेल्या दिलीप घोष यांच्या ताफ्यावर काही जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

दिलीप घोष यांचा चाय पे चर्चा नावाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपवून ते येत असताना हा भयंकर हल्ला झाला आहे. दिलीप घोष हे या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या ताफ्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. इतकच नाही तर गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. या हल्ल्यात गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

हे वाचा-ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीचा भारतात महत्त्वाचा टप्पा पार; लवकरच GOOD NEWS मिळणार

मृत्यूचा खेळ खेळून कोणालाही मते मिळू शकत नाहीत. हा शब्द भिंतीवर लिहा, शब्द वाचा. असं बिहारच्या निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान दिलं होतं आणि त्यानंतर 24 तासांत पश्चिम बंगालमध्ये भाजप अध्यक्षावर हल्ला करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: West bengal, West Bengal bjp