कोरोनाबाधित 82 वर्षांची आजी हॉस्पिटलमधून गायब; प्रशासनाची वाढली डोकेदुखी

कोरोनाबाधित 82 वर्षांची आजी हॉस्पिटलमधून गायब; प्रशासनाची वाढली डोकेदुखी

पुण्यात राहणाऱ्या त्यांच्या नातवाने जळगाव रुग्णालयात फोन केल्यावर हा प्रकार लक्षात आला.

  • Share this:

भुसावळ, 7 जून: जळगाव जिल्ह्यात कोरोनानं कहर केला असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यात भुसावळ येथील राहणारी 82 वर्षांची कोरोनाबाधित आजी जिल्हा रुग्णालयातून बेपत्ता झाली आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आरोग्यविभासह पोलिस आजीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा.. कोरोनाने घेतला तरुण पत्रकाराचा बळी, हैदराबाद येथे सुरू होता उपचार

मिळालेली माहिती अशी की, पुण्यात राहणाऱ्या त्यांच्या नातवाने जळगाव रुग्णालयात फोन केल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे कोरोना नियंत्रण कक्ष वाऱ्यावर आहे, असा आरोप आता केला जात आहे.

कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेली 82 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिला गेल्या 2 जूनपासून बेपत्ता झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण यंत्रणेची झोप उडाली आहे. मूळ भुसावळ येथे राहणारी ही महिला 1 जून रोजी त्रास होत असल्यामुळे तेथील रुग्णालयात दाखल झाली होती. दुसऱ्या दिवशी तिचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तिची जळगावच्या कोविड रुग्णालयात रवानगी केली होती. त्यानंतर 2 रोजी ही वृद्धा कोविड रुग्णालयातून बेपत्ता झाली. या घटनेनंतर यंत्रणा खडबडून जागी होऊन वृद्धेचा शोध सुरू केला. चार दिवस उलटून ही वृद्धा अद्याप मिळून आलेली नाही. तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अखेर वृद्धेच्या नातेवाइकांना जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जाऊन हरवल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार जिल्हापेठ पोलिसांनी कोविड रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथील सर्व कॅमेरे बंद असल्याचा धक्कादायक प्रकारही यामुळे समोर आला आहे. आता पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यामुळे वृद्धेस शोधणे कठीण झाले आहे. तर कोविड रुग्णालयाचा गलथान कारभार यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.  जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात सर्वाधित कोरोनाचे रुग्ण आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिस आजीचा शोध घेत आहे.

हेही वाचा...शरद पवारांच्या काटेवाडीतील शेतकरी झाले भयभीत, जाणून घ्या काय आहे कारण...

मुंबईतही घडली होती अशीच घटना...

केईएम रुग्णालायतून 75 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण सुधाकर खाडे काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते. त्यांच्या जावयाने रुग्णालयात संपर्क केला असता ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती.  याप्रकरणानंतर 15 दिवसांनी सुधाकर खाडे यांचा मृतदेह केईएम रुग्णालयाच्या शवागृहात सापडला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर केईएम रुग्णालयाच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

First published: June 7, 2020, 3:04 PM IST

ताज्या बातम्या