मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Unlock 1: महाराष्ट्रात उद्या मंदिरं आणि मॉल्स उघडणार का? बाहेर पडण्यापूर्वी हे वाचा

Unlock 1: महाराष्ट्रात उद्या मंदिरं आणि मॉल्स उघडणार का? बाहेर पडण्यापूर्वी हे वाचा

देशात सोमवार (8 जून)पासून Unlock 1चा नवा टप्पा सुरू होत आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये उद्यापासून मंदिर आणि मॉल्स सुरू होणार आहे.  मात्र राज्याने वेगळा निर्णय घेतला आहे.

देशात सोमवार (8 जून)पासून Unlock 1चा नवा टप्पा सुरू होत आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये उद्यापासून मंदिर आणि मॉल्स सुरू होणार आहे. मात्र राज्याने वेगळा निर्णय घेतला आहे.

देशात सोमवार (8 जून)पासून Unlock 1चा नवा टप्पा सुरू होत आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये उद्यापासून मंदिर आणि मॉल्स सुरू होणार आहे. मात्र राज्याने वेगळा निर्णय घेतला आहे.

पुणे 7 जून: देशात सोमवार (8 जून)पासून Unlock 1चा नवा टप्पा सुरू होत आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये उद्यापासून मंदिर आणि मॉल्स सुरू होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम सुरू करा अशी अट सरकारने घातली आहे. मात्र महाराष्ट्रात 30 जून पर्यंत मंदिरं आणि मॉल्स बंदच राहणार आहेत. राज्य सरकारने त्याबाबतचे आदेश काढले होते. त्यामुळे राज्यात नागरिकांनी मंदिरात गर्दी करून नये असं आवाहन अनेक मंदिरांच्या विश्वस्तांनी केलंय.

सोमवारी संकट चतुर्थी असल्याने पुण्याच्या श्री देवदेवेश्वर संस्थान (पर्वती-सारसबाग)पुणे यांच्यातर्फेही एक निवेदन देण्यात आलं असून लोकांना आवाहन करण्यात आलं आहे. त्यात म्हटलं

संस्थानचे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांनी एका पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केलीय. ते म्हणतात,

"लॉकडाऊनच्या नव्या टप्प्यात केंद्र सरकारने 8 जून पासून मंदिरे खुली होत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र राज्यसरकारने मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असल्याने श्री देवदेवेश्वर संस्थानची  सारसबाग सिद्धिविनायक मंदिर, तसेच कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती  आणि  म्रृत्युंजय ही मंदिरे 30 जून पर्यंत बंदच रहाणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन संस्थान तर्फे करण्यात आले आहे. शासनाच्या पुढील आदेशानुसार जुलै महिन्यात मंदिरे सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येइल" असं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबईत बॉलिवूड दिग्दर्शकाच्या घरात चोरी, हातावरील टॅटूमुळे पकडले गेले आरोपी

दरम्यान,  राज्यात आज 3007 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 85975 अशी झाली आहे. आज नवीन 1924 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 39314 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 43591 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातली रुग्णसंख्या 85 हजारांच्या वर गेल्याने महाराष्ट्राने चीनलाही मागे टाकले आहे. तर देश कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात 5 व्या क्रमांकावर असून स्पेनलाही भारताने मागे टाकले आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये संख्या अशीच राहिल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई मरीन ड्राईव्हवर चहा-स्नॅक्स पार्टी, सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

सध्या राज्यात 43591 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात ४७ शासकीय आणि ३८ खाजगी अशा एकूण ८५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ३७ हजार १२४ नमुन्यांपैकी ८२ हजार ९६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ४६ हजार ५६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक  क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७४१ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ०९८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Temples