• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • काँग्रेस सत्तेसाठी लाचार, जनाची नाही..मनाची असेल तर बाहेर पडा, विखे पाटलांची खोचक टीका

काँग्रेस सत्तेसाठी लाचार, जनाची नाही..मनाची असेल तर बाहेर पडा, विखे पाटलांची खोचक टीका

राज्यात कोरोनानं थैमान घातलं असताना दुसरीकडे राजकारण चांगलंच तापलं आहे.

  • Share this:
शिर्डी, 27 मे: राज्यात कोरोनानं थैमान घातलं असताना दुसरीकडे राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींचे विधान दुटप्पीपणाचे आहे. काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे जनाची नाही, मनाची असेल तर सत्तेबाहेर पडा, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. हेही वाचा...काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्या अडचणीत वाढ, उन्नावनंतर लखनऊमध्ये FIR दाखल राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, काँग्रेस दोन्ही बाजूने ढोलकी वाजवत आहे. सत्तेत राहून मलीदा चाखण्याचं काँग्रेसचं काम सुरु आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील जनता हवालदिल झालेली असताना मंत्री गायब झाले आहेत. काँग्रेसचे मंत्री मुंबईत जावून का थांबलेत..? असा सवाल त्यांनी केला आहे. राज्याच्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी सोबत काँग्रेसही तेव्हढीच जबाबदार असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला आहे. राज्याचा कारभार 'फेसबुक'वरुन चालणार का? कोरोनाचं संकंट निवारण्यात उद्धव ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे. राज्यातील जनता कोरोना संकंटात होरपळी असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री 'फेसबुक'वरच संवाद साधतात. त्यामुळे सरकारचा कारभार यापुढे आता फक्त फेसबुकवर चालणार का?, असा खोचक सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. हेही वाचा... राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात फोनवर चर्चा केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची राज्यात अंमलबजावणी केली जात नाही. केंद्राने दिलेल्या निधीचा योग्य उपयोग राज्य सरकार करत नाही, असा गंभीर आरोप विखे पाटलांनी 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनात केला होता.
Published by:Sandip Parolekar
First published: