Home /News /mumbai /

बापरे! 80 वर्षीय महिलेच्या स्विस बॅंकेत सापडले तब्बल 200 कोटी, महिन्याची कमाई वाचून व्हाल थक्क

बापरे! 80 वर्षीय महिलेच्या स्विस बॅंकेत सापडले तब्बल 200 कोटी, महिन्याची कमाई वाचून व्हाल थक्क

मुंबईतील एका 80 वर्षीय वृद्ध महिलेकडे तब्बल 196 कोटींचा काळा पैसा सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    मुंबई, 20 जुलै : स्विस बॅंकेत मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे, हे सर्वांना ठावूक आहे. मात्र मुंबईतील एका 80 वर्षीय वृद्ध महिलेकडे तब्बल 196 कोटींचा काळा पैसा सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे मासिक उत्पन्न केवळ 14 हजार रुपये असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, आयकर विभाग अपीलीय न्यायाधिकरणाच्या (आईटीएटी) मुंबई शाखेने महिलेला करासह दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रेणू थरानी असे या महिलेचे नाव असून. त्यांनी एक खाते एचएसबीसी जिनिव्हामध्ये आहे. थरानी फॅमिली ट्रस्टच्या नावावर या बँकेचा एकमेव अकाउंट आहे. जुलै 2004 मध्ये केमन येथील जीडब्ल्यू इन्व्हेस्टमेंट या नावाने खाते उघडले गेले, ज्यांनी हा निधी फॅमिली ट्रस्टला प्रशासक (administrator) म्हणून हस्तांतरित केले. वाचा-बिचारा रिपोर्टर! मास्क न घालता प्रश्न विचारायला गेला, उत्तरात मिळाला ‘कोरोना’ थरानी यांनी 2005-06मध्ये भरलेल्या करात ही माहिती दिली नव्हती. 31 ऑक्टोबर 2014 रोजी हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले. एसबीसी जिनिव्हामध्ये आपले बँक खाते नाही किंवा ते जीडब्ल्यू इन्व्हेस्टमेंट बँकेत भागधारक नाहीत असे प्रतिज्ञापत्र थरानी यांनी दाखल केले होते. 2005-06 मध्ये टॅक्स रिटर्नमध्ये थरानी यांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न फक्त 1.7 लाख रुपये दाखवले होते. त्यांनी पत्ताही बंगळूरूचा दिला होता. यटीएटी खंडपीठाने असे म्हटले आहे की कदाचित थरानी या अनिवासी दर्जाच्या पहिल्या वर्षात असतील. मात्र, इतक्या अल्पावधीत दोनशे कोटींची रक्कम कशी उभी केली हे समजू शकले नाही. वाचा-34 वर्षानंतर लागू होणार नवा ग्राहक संरक्षण कायदा,उपभोक्त्यांना मिळणार हे अधिकार खंडपीठाने म्हटले आहे की थरानी कोणतीही संस्था चालवत नाहीत, त्यामुळे त्यांना एवढी रक्कम कोणी दान केली असेल हे ही अमान्य आहे. खंडपीठाने असेही यावेळी नमुद केले ही, 14 हजार महिना कमवल्यास त्यांच्या खात्यात 200 कोटी जमा होण्यास 500 वर्ष लागतील. वाचा-पैसे काढण्यासाठी SBI एटीएमची आहे ही मर्यादा, विसरलात तर द्यावं लागेल शुल्क
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Swiss Bank

    पुढील बातम्या