मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BREAKING : 6 दहशतवादी अटक प्रकरण मास्टरमाईंडच्या कुटुंबीयांना मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात LIVE VIDEO

BREAKING : 6 दहशतवादी अटक प्रकरण मास्टरमाईंडच्या कुटुंबीयांना मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात LIVE VIDEO

 या दहशतवाद्यांचा मास्टरमाईंड जान शेख (Jan Mohammad shaikh)  याला अटक केली आहे. तो मुंबईतील सायन (sion) भागात राहणार आहे.

या दहशतवाद्यांचा मास्टरमाईंड जान शेख (Jan Mohammad shaikh) याला अटक केली आहे. तो मुंबईतील सायन (sion) भागात राहणार आहे.

या दहशतवाद्यांचा मास्टरमाईंड जान शेख (Jan Mohammad shaikh) याला अटक केली आहे. तो मुंबईतील सायन (sion) भागात राहणार आहे.

मुंबई, 14 सप्टेंबर : नवी दिल्लीत (delhi) 6 दहशतवाद्यांना अटक (6 terrorists arrested in Delhi) करण्यात आल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे.  या दहशतवाद्यांचा मास्टरमाईंड जान शेख (Jan Mohammad shaikh)  याला अटक केली आहे. तो मुंबईतील सायन (sion) भागात राहणार आहे. मुंबई पोलिसांनी (mumbai police) आता त्याच्या कुटुंबीयाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दिल्ली दहशतवादी प्रकरण  मुंबईतील अटक केलेल्या  जान मोहम्मद शेख उर्फ समिर कालिया उर्फ अली मोहम्मद शेख असं या दहशतवाद्याच्या कुटुंबीयांना मुंबई पोलिसांनी चौकशीला ताब्यात घेतले आहे. त्याच्या परिवाराची चौकशी सुरू आहे.  धारावी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली होती.  गेल्या महिन्याभरापासून हे ऑपरेशन सुरू होतं. 6 दहशतवाद्यांपैकी मुंबईतून एका जणाला अटक करण्यात आली होती. जान शेख हा सायन भागात राहणार आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर इतर पाच जणांना अटक करण्यात आली.  जान शेख हा मुख्य सुत्रधार असल्याचं समोर आलं आहे. हाच जान शेख अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता. एवढंच नाहीतर जान शेख 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. त्यांना देखील अटक केली आहे.

सातारा नगरपालिकेत उदयनराजेंनी दिले शिवेंद्रराजेंसोबत न लढण्याचे संकेत

दहशतवादी कारवाया करण्याकरता जान शेख हा तरुणांना पाकमध्ये पाठवायचे काम करत होता. तसंच स्फोटकं तस्करीची त्याला माहिती आहे.  राजस्थान ( कोटा ) येथून जान शेखला दाऊद गॅंगचे काम पाहत होता. ऐन सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युपीमध्ये IED ब्लास्ट करण्याचा कट होता.

स्पेशल सेलने केलेल्या कारवाईत स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त केली आहेत. अटकेची ही कारवाई दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचे एक महिनापासून हे ऑपरेशन सुरू होते. स्लिपर सेलच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया सुरू होत्या. या सहा जणांनी दिल्ली, यूपी आणि महाराष्ट्रात फिरून रेकी केली होती.

आमदाराकडे GF ची मागणी करणारा 'तो' तरुण अखेर सर्वांसमोर आला; काय म्हणाला पाहा

स्पेशल सेल, यूपी एटीएस यांच्यासह प्रयागराज इथं छापा टाकला. यावेळी पाच जणांना अटक केली आहे. प्रयागराजमधील करेली या भागात हे सहा जण लपून बसले होते.  हे सर्व दशतवादी देशातील वेगवेगळ्या भागात घातपात घडवण्याच्या तयारीत होते. या सर्वांना मोठा कट सुद्धा रचला होता. अनेक राजकीय आणि मोठ्या व्यक्ती या सहा जणांच्या लिस्टवर होते.  पण, वेळीच स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने या सर्वांच्या मुसक्या आवळल्या आहे. या घटनेमुळे सर्व तपास यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai police