मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /साताऱ्यात पुन्हा राडा? नगरपालिकेत उदयनराजेंनी दिले शिवेंद्रराजेंसोबत न लढण्याचे संकेत

साताऱ्यात पुन्हा राडा? नगरपालिकेत उदयनराजेंनी दिले शिवेंद्रराजेंसोबत न लढण्याचे संकेत

उदयनराजेंनी रस्त्याचा शुभारंभ केला. त्यानंतर लगेच नगरविकास आघाडीकडून ज्या ठिकाणी उदयनराजे यांनी केलेल्या शुभारंभाचा बोर्ड लावला त्याच  शेजारी बोर्ड लावला आहे.

उदयनराजेंनी रस्त्याचा शुभारंभ केला. त्यानंतर लगेच नगरविकास आघाडीकडून ज्या ठिकाणी उदयनराजे यांनी केलेल्या शुभारंभाचा बोर्ड लावला त्याच शेजारी बोर्ड लावला आहे.

उदयनराजे यांनी एकाप्रकारे नगरपालिका निवडणुकीत स्वबळावरच लढण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही राजे हे एकाच पक्षात आहे.

सातारा, 14 सप्टेंबर : कोरोनामुळे रखडलेल्या स्थानिक निवडणुकांचा कार्यक्रम आता लवकरच जाहीर होणार आहे. सर्वच पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहे. पण,  सातारा नगरपालिका निवडणुकीत ( Satara municipal elections) आमदार शिवेंद्रराजे भोसले (shivendra raje bholse) यांच्यासोबत एकत्र लढणार नसल्याचं संकेत खुद्द भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी दिले आहे.

आज उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शहरातील स्ट्रीटलाईट शुभारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलत असताना उदयनराजे यांनी नगरपालिकेत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहे.

'सातारा विकास आघाडी केवळ आश्वासन देत नाही तर आम्ही शब्द देतो आणि तो पाळतो' असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी खोचक टोला  नगरविकास आघाडीला म्हणजेच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना लगावला आहे.

नीती आयोगाने केले महाराष्ट्राच्या कामगिरीचे कौतुक, मुख्यमंत्री म्हणाले...

'सातारा विकास आघाडीकडून नागरिकांच्या ज्या अपेक्षा होता, त्या पूर्ण केल्या आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव अशी सातारा विकास आघाडी आहे. तिने केलेल्या कामाचं जाहीरपणे ऑडिट बोर्ड लावले होते, यावेळी केलेल्या कामाची वचनपूर्ती ही झालेली आहे',  असं म्हणत उदयनराजे यांनी  कामाचा पाढा माध्यमांसमोर वाचला.

अफगाणिस्तानात पुन्हा सुरु होतंय ‘ते’ बदनाम मंत्रालय, सामान्यांचं जगणं होणार कठीण

उदयनराजे यांनी एकाप्रकारे नगरपालिका निवडणुकीत स्वबळावरच लढण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही राजे हे एकाच पक्षात आहे. पण, दोन्ही राजे यांना मानणारे गट हे वेगवेगळे आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे आधीच निवडणूक लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. पण, आता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे उदयनराजे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्यामुळे होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र लढणार की मनोमिलन तुटणार यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

First published:
top videos