Home /News /maharashtra /

गर्लफ्रेंडसाठी आमदाराला पत्र लिहिणारा 'तो' तरुण अखेर सर्वांसमोर आला; VIDEO तून केला धक्कादायक खुलासा

गर्लफ्रेंडसाठी आमदाराला पत्र लिहिणारा 'तो' तरुण अखेर सर्वांसमोर आला; VIDEO तून केला धक्कादायक खुलासा

ज्या तरुणाच्या नावाने हे पत्र व्हायरल होतं आहे, तो नेमकं काय म्हणाला पाहा.

हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 14 सप्टेंबर : आपल्या मुलगी पटत नाही, गर्लफ्रेंड (Girlfriend) हवी आहे यासाठी आतापर्यंत लव्ह गुरूचा सल्ला घेतल्याचं आपण ऐकलं आहे. पण एका तरुणाने थेट आमदाराला पत्र लिहिलं  (Letter to mla for girlfriend) जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. अखेर तो तरुण आता सर्वांसमोर आला आहे. गर्लफ्रेंडसाठी आमदाराला लिहिलेल्या त्या पत्राबाबत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. चंद्रपुरातील (Chandrapur) भूषण जांबुवंत राठोडच्या (Bhushan rathore) नावाने विधानसभा क्षेत्रातील आमदार सुभाष धोटे (MLA Subhash dhote) यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. हे पत्र आपल्यापर्यंत पोहोचलं नसल्याचं आमदार धोटे यांनी सांगितलं. पण नंतर या तरुणाचा शोध सुरू झाला. धोटे यांच्या कार्यकर्त्यांनी या तुरणाला शोधूून काढलं. त्यानंतर या पत्रामागील खरं सत्य समजलं. खरंतर ज्या तरुणाच्या नावाने हे पत्र लिहिण्यात आलं त्यालाचा या पत्राबाबत काही कल्पना नव्हती. भूषणच्या मित्रांनी हा सर्व प्रताप केला होता. त्याच्या मित्रांनी ही कबुली दिली आहे.  तसंच भूषणने आमदारांची माफीही मागितली आहे. हे वाचा -"Work From Home बंद करा, नाहीतर आमचा संसार मोडेल"; हर्ष गोयंकांना महिलेची विनंती गमतीने हे पत्र लिहिण्यात आलं होतं, जे व्हायरल झालं. आमदार सुभाष धोटे आपल्याला वडीलधारे असून त्यांना त्रास देण्याचा कुठलाही विचार नसल्याचे भूषण आणि मित्रांनी स्पष्ट केलं. या कृतीविषयी सर्वांना पश्चाताप असून त्यांनी माफी मागितली आहे. काय होतं पत्रात? या पत्रात नमूद केलं आहे की, 'माननीय आमदार साहेब संपूर्ण तालुक्यात भरभरून मुली आहेत. पण मला एकही मुलगी पटत नसून ही चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे.  मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर इथं रोज जाणं येणं करतो. परंतु मला एकही मुलगी पटत नाही. दारू विकणाऱ्याला आणि काळ्या डोमड्यांना गर्लफ्रेंड असते, ते  बघून माझा जीव जळून राख होतो' 'राजुरा विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहित करायला हवं, आमच्यासारख्यांनासुद्धा भाव देण्यात यावा', अशी विनंती त्याने आमदारांना केली आहे. हे वाचा - व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी! चक्क बाईकची कार बनवली; तरुणाने काय केला जुगाड पाहा VIDEO आमदार सुभाष धोटे यांच्या कार्यकर्त्यानी या तरुणाला शोधून काढल्यावर आ. धोटे यांनी गावाला भेट देत ग्रामस्थ आणि युवकांशी संवाद साधला.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Chandrapur, Girlfriend, Love story, Mla

पुढील बातम्या