• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • तळीरामांसाठी गोड बातमी, राज्यात 'या' दारूच्या उत्पादन शुल्कात तब्बल 50 टक्के कपात!

तळीरामांसाठी गोड बातमी, राज्यात 'या' दारूच्या उत्पादन शुल्कात तब्बल 50 टक्के कपात!

 किंमत कमी झाल्यामुळे बाटल्यांची विक्री वाढण्याची शक्यता आहे. सध्या 1 लाख बाटल्यांच्या विक्री होते आता हेच प्रमाण2.5 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता...

किंमत कमी झाल्यामुळे बाटल्यांची विक्री वाढण्याची शक्यता आहे. सध्या 1 लाख बाटल्यांच्या विक्री होते आता हेच प्रमाण2.5 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता...

किंमत कमी झाल्यामुळे बाटल्यांची विक्री वाढण्याची शक्यता आहे. सध्या 1 लाख बाटल्यांच्या विक्री होते आता हेच प्रमाण2.5 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता...

  • Share this:
    मुंबई, 20 नोव्हेंबर : कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा आता खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठा आता पूर्वीप्रमाणे फुलून गेल्या आहेत. त्यातच आता तळीरामांना राज्य सरकारने (maharashtra government) मोठा दिलासा दिला आहे. राज्यात आयात करणाऱ्या दारूवर (scotch whisky ) उत्पादन शुल्क तब्बल 50 टक्क्यांनी कपात करण्यात आला आहे. राज्य सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आयात करण्यात आलेल्या स्कॉचवरील उत्पादन शुल्क 50 टक्के कमी केले आहे. या निर्णयामुळे इतर राज्यात असलेल्या दारूच्या किंमती राज्यातली किंमती एक समान असणार आहे. टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असता एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क हे उत्पादन खर्चातून कमी करण्यात आले आहे. 300 रुपये असलेला खर्च तो 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. गुरुवारी याबद्दल अधिसूचना जारी करण्यात आली आहे' EPFO ची InvIT ला गुंतवणूक पर्याय म्हणून मान्यता दिली, PF वर मिळणार अधिक व्याज राज्यात अनेक प्रकारचे मद्य हे आयात होत असतात. स्कॉच प्रकारच्या दारूतून राज्याला मोठा महसूल मिळतो. राज्य सरकारला स्कॉचच्या विक्रीतून वर्षाला 100 कोटींचा महसूल मिळत असतो. या कपातीतून आता राज्याच्या महसुलामध्ये वाढ होणार आहे. राज्याचा महसूल आता 250 कोटी रुपये वार्षिक होण्याची अपेक्षा आहे. किंमत कमी झाल्यामुळे बाटल्यांची विक्री वाढण्याची शक्यता आहे. एक लाख बाटल्यांच्या विक्रीचे प्रमाण आता 2.5 लाखांपर्यंत वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लग्नात घेतले 70 लाख कॅश आणि 50 तोळं सोनं; कांड करून नवरदेव अमेरिकेला फरार किंमती जास्त असल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात बनावट दारूच्या विक्रीचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे या विक्रीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे दारु तस्करीला आळा बसणार आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे राज्यात आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किंमतीत कमी झाल्यामुळे त्याची विक्री वाढणार आहे, त्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होणार आहे. सध्या राज्यात दिवसाला १ लाख बाटल्यांची विक्री होत असते आता याचे प्रमाण आणखी वाढणार आहे.  त्यामुळे आता तळीरामांना स्कॉच ही स्वस्तात मस्त मिळणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published: