इंदूर, 20 नोव्हेंबर : देशात वारंवार लग्नादरम्यान (Marriage) फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येत आहत. आता तर मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) इंदूरमधून एक लुटारू इंजिनिअर नवरदेव समोर आला आहे. त्याने फसवणुकीसाठी अगदी वेगळ्याच पद्धतीचा वापर केला. आरोपीने पहिल्यांदा राजस्थानमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सेलिब्रिटी स्टाईलमध्ये लग्न केलं. त्यानंतर लग्नाच्या महिनाभरानंतर वधूचे 25 लाख घेऊन तो अमेरिकेला पळून गेला. पत्नी आणि तिच्या पालकांनी त्याच्याविरुद्ध मुंबईतील माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. उदयपूरच्या ताज लेक पॅलेसमध्ये विवाहसोहळा पार पडला विशाल अग्रवा असे या फ्रॉड नवरदेवाचे नाव असून, तो व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो मूळचा इंदूरच्या लासुदिया पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. शहरातील पलासिया येथील शेखर बिल्डिंगमध्ये त्यांचे कार्यालय आहे. आरोपीने 6 महिन्यांपूर्वी 25 एप्रिल 2021 रोजी मुंबईतील निधीसोबत उदयपूर येथील ताज लेक पॅलेसमध्ये लाखो रुपये खर्चून लग्न केले. आरोपीने साखरपूड्यात घेतले 70 लाख आरोपीचे वडील विमल अग्रवाल इंदूरमध्ये प्रॉपर्टीचं काम करतात. त्यांनी या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आपल्या ओळखीच्या अनिल अग्रवाल आणि सुधा अग्रवाल याच्या माध्यमातून मुंबईत राहणारे शेअर कमोडिटीशी जोडलेले अजय अग्रवाल आणि सुधा अग्रवालच्या मुंबईत राहणाऱ्या शेअर कमोडिटीशी संबंधित अजय अग्रवालशी त्याची मुलगी निधीसोबत लग्नाची बोलणी केली होती. अजयने आपल्या मुलीच्या आनंदासाठी हे लग्न नक्की केलं. आरोपी विशालने साखरपुड्यात 70 लाख रुपये नवरदेवीच्या वडिलांकडून घेतले. 50 तोळं सोनं आणि लग्नात 90 लाख घेतले अजय अग्रवाल आरोपी कुटुंबाच्या जाळ्यात अडकले आणि मुलीच्या लग्नात लाखो रुपये खर्च केले. यासाठी तब्बल दीड कोटींचा खर्च झाला. निधीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, विशालने हुंडा घेतला आणि त्यानंतर 2 कोटी 41 लाख रुपये कॅश आणि ज्वेलरी घेतली. वडिलांनी लग्नात 50 तोळं सोनं आणि 300 ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह 90 लाख रुपये दिले होते. मात्र यानंतरही त्याचा हाव थांबला नाही. आरोपीच्या वडिलांनी त्यांच्याकडून काही कामासाठी 18 लाख रुपये घेतले आणि परत केले नाही. हे ही वाचा- नवरा तुरुंगात गेल्यानंतर पत्नीने सांभाळला अवैध व्यवसाय; साम्राज्य वाढवलं! पीडित नवरीने सांगितलं की, विशालने माझ्याकडूनही अनेकदा लाखो रुपये घेतले होते. त्याचं संपूर्ण कुटुंब फसवणूक करीत होते. विशालने याआधी दोन वेळ लग्न केलं आहे. आठ दिवसांपूर्वीच तो एका लग्नातूून पळून आला होता. त्याच्या कुटुंबीयांनी याआधीच्या दोन लग्नात लाखो रुपये उकळले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.