मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /चोर-पोलिसांचा 350 किमीचा भयानक थरार, अखेर नेपाळी गँगच्या नांग्या ठेचण्यात यश

चोर-पोलिसांचा 350 किमीचा भयानक थरार, अखेर नेपाळी गँगच्या नांग्या ठेचण्यात यश

वसई पोलिसांनी (Vasai Police) धडाकेबाज कामगिरी केली आहे. घरफोडी करणाऱ्या नेपाळी गँगचा (Nepali Gang) शेकडो किमी पाठलाग करुन त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत.

वसई पोलिसांनी (Vasai Police) धडाकेबाज कामगिरी केली आहे. घरफोडी करणाऱ्या नेपाळी गँगचा (Nepali Gang) शेकडो किमी पाठलाग करुन त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत.

वसई पोलिसांनी (Vasai Police) धडाकेबाज कामगिरी केली आहे. घरफोडी करणाऱ्या नेपाळी गँगचा (Nepali Gang) शेकडो किमी पाठलाग करुन त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत.

विजय देसाई, प्रतिनिधी

पालघर, 3 डिसेंबर : वसई पोलिसांनी (Vasai Police) एक मोठी कामगिरी केली आहे. घरफोडी करणाऱ्या नेपाळी गँगच्या (Nepali Thieves Gang) मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी वसईत घरफोडी केली. ते गुजरातमार्गे (Gujrat) नेपाळच्या दिशेला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पण चोरांचा सुगावा पोलिसांना लागला. त्यानंतर चोर-पोलिसांच्या पकडापकडीचा भयानक थरार रंगला. पोलिसांनी चोरांचा सुरत (Surat) ते गोध्रा (Godhra) असा 350 किमीचा थरारक पाठलाग केला. त्यानंतर अखेर त्यांच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांना या नेपाळी गँगकडून 13 लाख 93 हजारांचा मुद्देमाल मिळाला आहे. हा सर्व ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाचे उपायुक्त संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. वसईतील भाबोला परिसरात एका घरातील 6 दरवाजांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील मुद्देमाल चोरी केला होता. संबंधित चोरीची घटना 30 नोव्हेंबरला घडली होती. त्यावेळी घरातील कुटुंब हे एका लग्नाच्या कार्यक्रमात गेले होते. याच गोष्टीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरफोडी करत चोरी केली होती. या दरम्यान या चोरीची माहिती वसई पोलिसांना लागली. पोलिसांनी तातडीने चोरांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : नारायण राणेंच्या सुरक्षेत आणखी वाढ, केंद्राकडून आता थेट Z दर्जाची सुरक्षा

पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?

गुन्हे शाखा युनिट दोनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरुन पुरावे गोळा करुन तात्काळ चार पथके आरोपींना पकडण्यासाठी सुरत, पनवेल आणि वसई परिसरात रवाना केले होते. चोरी करुन आरोपी सुरतच्या दिशेने पळत असल्याची ठोस माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सुरत ते गोध्रा असा 350 किमी अंतरापर्यंत आरोपींचा पाठलाग केला. त्यांनंतर चोरांना गोध्रा येथून अटक केली.

हेही वाचा : भारतात ओमायक्रोनबाधित आढळलेला पहिला रुग्ण हॉटेलमधून पळाला

आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी नेपाळचे रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपी सुरेंद्र अमृत बोगाटी, झापतसोप साबण, शेर बहादूर शाही यांना नेपाळला पळून जाण्यापूर्वी अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून 10 ग्रॅम सोन्याचे दागिने, 8 किलो चांदीचे दागिने, 10 घड्याळे, एक लॅपटॉप, एक आयपॉड आणि 1 लाख 24 रुपयांची असा एकूण 13 लाख 93 हजार चा मुद्देमाल जप्त केले आहे.

First published: