मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : पुजारा-रहाणे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार? टीम इंडियातून आली मोठी Update

IND vs SA : पुजारा-रहाणे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार? टीम इंडियातून आली मोठी Update

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला (India vs New Zealand 2nd Test) मुंबईमध्ये सुरूवात झाली आहे. हा सामना संपल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India tour of South Africa) जाणार आहे. या दौऱ्यात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) संधी मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

पुढे वाचा ...

मुंबई, 3 डिसेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला (India vs New Zealand 2nd Test) मुंबईमध्ये सुरूवात झाली आहे. हा सामना संपल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India tour of South Africa) जाणार आहे. या दौऱ्यात 3 टेस्ट, 3 वनडे आणि 4 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे भारत सरकारने अजून या दौऱ्याला परवानगी दिलेली नाही, पण हा दौरा झालाच तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) संधी मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली नाही. रहाणेच्या मांडीचा स्नायू दुखावला गेल्यामुळे तो खेळत नसल्याचं विराट आणि बीसीसीआयने (BCCI) सांगितलं, पण अनेकांनी रहाणेला टीममधून काढल्याचं मत मांडलं आहे. गेल्या काही काळापासून पुजारा आणि रहाणे संघर्ष करत आहेत. पुजारा तर या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झाला, त्यामुळे त्याच्या निवडीवरही टीका केली जात आहे.

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा फॉर्ममध्ये नसले तरीदेखील त्यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी दिली जाणार असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. रहाणे-पुजारा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जातील, पण या दोघांसाठी ही संधी शेवटची असेल, असं या वृत्तात सांगण्यात आलं आहे. निवड समिती, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना थेट दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानात्मक वातावरणात खेळवण्याबाबत संभ्रमात आहेत, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

श्रेयस अय्यरने त्याच्या पदार्पणाच्या टेस्टमध्येच शतक आणि अर्धशतक केलं, असा विक्रम करणारा तो टीम इंडियाचा पहिला खेळाडू ठरला. तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवला अजून टेस्टमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नाही. या दोघांना दक्षिण आफ्रिकेतल्या जलद खेळपट्टीवर थेट उतरवणं टीम मॅनेजमेंटला धोक्याचं वाटत आहे. तसंच दक्षिण आफ्रिकेतली टेस्ट सीरिज ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे. पुजारा आणि रहाणेला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात संधी देऊन लाईफ लाईन देण्यात येणार असली तरी या दौऱ्यात अपयश आलं, तर मात्र त्यांच्या करियरला कायमचा ब्रेक लागू शकतो.

पुजाराने 2020 मध्ये 20.37 च्या सरासरीने तर 2021 मध्ये 30.42 च्या सरासरीने रन केले आहेत. रहाणेने तर या वर्षी 12 टेस्टमध्ये फक्त 19.57 रनच्या सरासरीने बॅटिंग केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये पुजाराने 26 आणि 22 तर रहाणेने 35 आणि 4 रनची खेळी केली.

First published: