जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / ...अन् गाढ झोपेत असतानाच 12 वर्षीय मुलावर 'मृत्यू' कोसळला, पनवेलमधील मन हेलावणारी घटना

...अन् गाढ झोपेत असतानाच 12 वर्षीय मुलावर 'मृत्यू' कोसळला, पनवेलमधील मन हेलावणारी घटना

...अन् गाढ झोपेत असतानाच 12 वर्षीय मुलावर 'मृत्यू' कोसळला, पनवेलमधील मन हेलावणारी घटना

या घटनेत सुकापूरमधील नवजीवन सोसायटीचा स्लॅब मध्यरात्रीच कोसळला आणि या स्लॅबसोबतच सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगरही कोसळला. कारण स्लॅब कोसळून या घटनेत एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला

  • -MIN READ Panvel,Raigad,Maharashtra
  • Last Updated :

प्रमोद पाटील, पनवेल 12 डिसेंबर : पनवेलमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत सुकापूरमधील नवजीवन सोसायटीचा स्लॅब मध्यरात्रीच कोसळला आणि या स्लॅबसोबतच सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगरही कोसळला. कारण स्लॅब कोसळून या घटनेत एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. खंडाळा घाटात विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली; दोघांचा मृत्यू, 35 जखमी ही घटना रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान घडली . घरातील सगळे झोपेत असताना हा प्रकार घडला. यात दोघं जखमी झाले असून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत इमारतीचा दुसरा आणि पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला आणि एकच खळबळ उडाली. गाढ झोपेत असलेल्या या कुटुंबाला कल्पनाही नव्हती की पुढच्याच क्षणी त्यांना आपला 12 वर्षाचा मुलगा गमवावा लागेल. पनवेल परिसरात अनेक इमारती पूर्णपणे जीर्ण झाल्या आहेत. त्यातील रहिवाशांना या इमारती खाली करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही नागरिक जीव मुठीत धरून या धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत. त्यामुळे अशा घटना घडत असून ही एक त्यातीलच घटना आहे. Video : नाशिक, मुंबई महामार्गावर बर्निंग कंटेनरचा थरार; धावत्या कंटेनरने अचानक घेतला पेट ही घटना ज्या इमारतीमध्ये घडली ती इमारत दोन मजल्यांची होती आणि यात तीन कुटुंबं राहत होती. इमारतीचा स्लॅब कोसळत असल्याचं जाणवताच आतमधील इतर सगळे लोक लगेचच बाहेर धावले. मात्र, हा 12 वर्षीय मुलगा बाहेर पडू शकला नाही आणि स्लॅब अंगावर कोसळून त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात