जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / खंडाळा घाटात विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली; दोघांचा मृत्यू, 35 जखमी

खंडाळा घाटात विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली; दोघांचा मृत्यू, 35 जखमी

खंडाळा घाटात विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली; दोघांचा मृत्यू, 35 जखमी

खोपोली जवळ झालेल्या बसच्या अपघातामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ Khopoli,Raigad,Maharashtra
  • Last Updated :

खोपोली, 11 डिसेंबर : खोपोली जवळ झालेल्या बसच्या अपघातामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. खंडाळा घाटात आज संध्याकाळच्या सुमारास बस उलटली. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चेंबूरमधील एका क्लासचे विद्यार्थी वेट एँण्ड जॉयला सहलीला गेले होते. मृत्यू झालेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एक मुलगा तर दुसरी मुलगी आहे. यातल्या मुलीचं नाव हितिका खन्ना तर मुलाचं नाव राज म्हात्रे आहे. दोन्ही मृत विद्यार्थ्यांना खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. या बसमध्ये एकूण 48 विद्यार्थी होते, यातले 35 जण जखमी तर 2 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. काही जखमींना खोपोलीला तर काहींना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बस पूर्ण क्षमतेने भरलेली होती. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने विद्यार्थ्यांना बसच्या बाहेर काढण्यात आलं. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदत आणि बचावकार्य सुरू केलं. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  सर्व विद्यार्थी मुंबईतील चेंबूर भागातील एका कोचिंग क्लासमध्ये शिकतात. हे सर्व लोक सहलीसाठी खोपोलीत आले होते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे अपघातानंतर जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक लोक आणि पोलिसांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात